प्रेस मीडिया लाईव्ह
विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील
मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळ पुनर्वसनमध्ये संपादित केलेल्या घराच्या बदल्यात सिडकोकडून मिळणाऱ्या भूखंडाची पात्रता निश्चित करण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवण्याकरिता तक्रारदाराकडून सात लाख रुपये लाचेची मागणी करणाऱ्या लाचखोर सिडको अधिकाऱ्याला पहिला हप्ता म्हणुन तीन लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे.
तक्रारदार यांच्याकडे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सिडको वर्ग २ चे क्षेत्र अधिकारी मुकुंद बंडा (वय वर्ष ५७) यांनी विमानतळ पुनर्वसनमध्ये संपादित केलेल्या घराच्या बदल्यात सिडकोकडून मिळणाऱ्या भूखंडाची पात्रता निश्चित करण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवण्यासाठी सात लाख रुपये लाचेची मागणी केली.त्या पैकी सिडको कार्यालयात आरोपी मुकुंद बंडा यांना पहिला हप्ता म्हणुन रुपये तीन लाख स्वीकारताना नवी मुंबई | लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपअधीक्षिका ज्योती देशमुख व त्यांच्या पथकाने रंगेहाथ ताब्यात घेतले आहे.