श्री बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ अंबप संचलित शैक्षणिक साधन निर्मिती व वापर कार्यशाळा संपन्न.

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

श्री बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ अंबप संचलित, "कॉलेज ऑफ एज्युकेशन "(बी.एड्.) पेठ वडगाव येथे शनिवार, दिनांक 11 फेब्रुवारी 2023 रोजी "शैक्षणिक साधन निर्मिती व वापर कार्यशाळा" हे बी. एड. प्रथम वर्षाचे प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले होते. या कार्यशाळेसाठी प्रमुख मार्गदर्शक मा. श्री. द्वारकानाथ विठ्ठल भोसले , कन्या विद्या मंदिर हुपरी नं.१ सहाय्यक शिक्षक उपस्थित होते. 


कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी प्र. प्राचार्या सौ. निर्मळे आर. एल. होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापिका सावंत ए.पी. यांनी केले. मार्गदर्शकांचा परिचय प्राध्यापक सोरटे एस. के.यांनी करून दिला. प्राचार्यांच्या हस्ते सरांचे स्वागत करण्यात आले. मार्गदर्शक भोसले सरांनी विविध विषयानुसार शैक्षणिक साधन निर्मिती कशी करावी व त्या साधनाचा त्या घटकांमध्ये कशाप्रकारे वापर करावा याचे सविस्तर कृतीयुक्त मार्गदर्शन केले. 

प्रत्येक विद्यार्थ्याकडून शैक्षणिक साधन तयार करून घेतले व तयार केलेल्या साधनांचे ज्ञानरचनावादानुसार नमुना पाठाचे विद्यार्थ्यांकडून प्रेझेंटेशन करून घेतले. शैक्षणिक साधन निर्मिती करतानाचे कार्यशाळेतील अनुभव विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतामध्ये व्यक्त केले. त्यानंतर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्राध्यापिका चरणकर जे. एस. यांनी मानले व कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेसाठी महाविद्यालयातील प्राध्यापिका शिरतोडे मॅडम, प्रा. सोरटे सर, प्रा. हाबळे सर, प्राध्यापिका सावंत मॅडम,  प्राध्यापिका चरणकर मॅडम, ग्रंथपाल चौगुले मॅडम तसेच शिक्षकेतर कर्मचारी व बी.एड्.प्रथम वर्षातील छात्राध्यापक व छात्राध्यापिका उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post