प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे शहर काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष बाळासाहेब दाभेकर हे काँग्रेसकडून इच्छूक होते. त्यांनी पक्ष श्रेष्ठींकडे उमेदवारी मागितली होती , पण पक्षाने रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिल्याने बाळासाहेब दाभेकर यांनी काँग्रेसमधून बंड पुकारले आहे. आज कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आज सकाळी त्यांच्या कार्यालयातून मोठ्या संख्येने कार्यकर्त्यासाहित दुचाकी वाहनांच्या रॅली काढण्यात आली. ही रॅली नारायण पेठेतील मोदी गणपती मंदिरापासून सुरू झाली. तेथून पुढे केसरीवाडा गणपती, दगडूशेठ गणपती मंदिर मार्गे गणेश कला क्रिडा रंगमंचाच्या सभागृहाजवळ समाप्त झाली आहे.
दांभेकर गेल्या 40 वर्षापासून काँग्रेस पक्ष काम करत आहे. ते पक्षाची एकनिष्ठ असून देखील पक्षाकडे उमेदवारी मागितली होती. मात्र, पक्षाने तीन वर्षांपूर्वीच काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या उमेदवाराला उमेदवारी दिली आहे. आमच्या सारख्या ज्येष्ठांना डावले जात आहे. राज्यात सत्यजित तांबे असतील बाळासाहेब थोरात असतील यांना देखील अंतर्गत गटबाजीचा फटका बसला आहे. तसाच मला देखील काँग्रेसच्या या अंतर्गत गटबाजीचा फटका बसला आहे. म्हणून मी बंडखोरी केली आहे असे यावेळी दाभेकर म्हणाले.
Tags
पुणे कसबा