प्रेस मीडिया लाईव्ह :
दिलीप कोळी : शिरढोण :
प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय माउंट अबू राजस्थान या विद्यालयाची स्थापना स्वयं परमात्मा शिवबाबा यांनी केली. त्यात अध्यात्मिक ज्ञान, सहज राजयोग ,देवी गुणाची धारणा, व्यसनमुक्ती, तणाव मुक्ती, जीवननातील खऱ्या सुखाची व शांतीची निर्मिती इत्यादी ज्ञान मोफत दिले जाते. प्रजापिता ब्रह्मकुमारी विद्यालय आज 140 देशात आहेत. 20000 पेक्षा अधिक शाखा आहेत.
शिरढोण शाखेला 24 वर्षे पूर्ण झाली. ईश्वरीय ज्ञान घेण्यासाठी आपण सात दिवस कोर्स करा लाभ घ्या असे शिरढोण महाशिवरात्रीच्या शिव ध्वजारोहण प्रसंगी श्री सचिन भाई म्हणाले. सर्वप्रथम सामाजिक कार्यकर्ते श्री अर्जुन मगदूम यांच्या हस्ते श्रीफळ वाढविण्यात आले. त्यानंतर पूजन करण्यात आले. सचिन भाई , बहनजी, माताजी, भाई यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. महाशिवरात्री महोत्सव भारतभर कानाकोपऱ्या साजरा करतात. सचिन भाई पुढे म्हणाले शिव परमात्मा भूतलावर अवतरले आहेत. कलियुगात दैवी दुनिया येणार आहे. आपण कुठून आलो? कोठे जाणार? आपला जीव गेला.
आत्मा निघून जातो. त्यानंतर स्मशानभूमी देह जळतात. आपल्या शरीरातील चैतनशक्ती आहेत. बिंदू आत्म्याचा विनाश होत नाही. शिव परमात्मा सर्वश्रेष्ठ आहे. वडिलांचा वडील आहे. परमात्मा आहे. त्यांनी जग पावन बनविले. आजच्या दुनियेत मानव काय काय करतो !! आपण डोळ्याने पाहत आहोत करोडपती रोडपती होण्यास वेळ लागत नाही. परमात्मा जन्ममृत्यूच्या फेऱ्यात येत नाही. अमर कोण आहे ?जन्माला आलो आहोत मरण आहे. जाताना पुण्याचे काम करून जा. परमात्मा पिता आहे. दयेचा सागर आहे. सृष्टीमध्ये परिवर्तन होणार . गीता पाठ शाळेतून ईश्वरीय ज्ञान दिले जाते. गीता पाठशालेचा लाभ घ्या अशी शेवटी सचिन भाई म्हणाले.
. यावेळी ज्योतगोंडा पाटील, महादेव टाकवडे, शिवाजी मगदूम , नाना मगदूम ,भाऊसो मगदूम, बाबू मगदूम, देवल कोरे, अशोक परीट, रावसाहेब पाणदारे, विठ्ठल बंडगर, पत्रकार दिलीप कोळी सह माताजी बहन जी भाई उपस्थित होते. कार्यक्रमानंतर प्रसाद वाटप करण्यात आले.