प्रेस मीडिया लाईव्ह
विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील
समस्त भाविक व प्रेमळ संतसज्जनांस कळविण्यांत आनंद होत आहे की, आमच्या रिस गावी श्री हनुमान मंदिराच्या जिर्णोध्दारानिमित्त श्री गजानन, श्री हनुमंतराव व श्री विठ्ठल रखुमाई मुर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा फाल्गुन शु. ॥ ९॥ मंगळवार, दि. २८/२/२०२३ रोजी व फाल्गुन शु. ॥१०॥ बुधवार, दि. १/३/२०२३ रोजी मोठया आनंदाने व भक्तीभावाने साजरा होत आहे. तरी या अनुपम्य सोहळयास सर्व भाविक भक्तांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही नम्र विनंती.
ॐ नियोजित कार्यक्रम...
मंगळवार, दि. २८/ २ / २०२३ रोजी• दुपारी २ वा. श्री विठ्ठल रखुमाई मिरवणूक (दिंडी) • दुपारी ३ ते ४ वा. श्री गणेश पूजन, स्वस्ति पुण्याहवाचन, मातृका पूजन, नांदी आ • सायं. ४ ते ५ वा. : वास्तु मंडल स्थापन, सर्वतोभद्र मंडल स्थापन, अग्रि स्थापन, नवग्रह मंडल स्थापन, हवन आरंभ : जलाधिवास, धान्यादिवास, हरिपाठ
• सायं. ५ ते ६.३० वा. • सायं. ६.३० ते ७.३० वा. शिव व्याख्यान- शिवव्याख्याते श्री. प्रशांतजी देशमुख, हातनोली रात्री. ८ नंतर महाप्रसाद व नंतर जागर भजन- ग्रामस्थ मंडळ रिस व काळणवाडी, रिसवाडी बुधवार, दि. १/३/२०१३ रोजी • सकाळी ७ ते ८.३० वा. : देवता उत्थापन, देव गायत्री हवन, त्रिपर्याय हवन, आसन शुध्दी • सकाळी ८.३० ते १० वा. मूर्ती स्थापना, कलशारोहण, प्राणप्रतिष्ठा, पूजा, आरती, ब्रम्हचारी पिरयोगी गणेशनाथजी महाराज गौरक्षनाथ मठ, मोहोपे-पोचंजे
• सायं. ६ ते ७ वा.
हरिपाठ व महाप्रसाद
● रात्री ९ ते ११ वा. कीर्तन - ह.भ.प. श्रीपाद महाराज जाधव, सातारा यांचे सुश्राव्य हरिकीर्तन होईल. व नंतर जागर भजन- ग्रामस्थ मंडळ रिस
॥ निमंत्रक ॥
ग्रामस्थ भजनी मंडळ, तरूण मंडळ, महिला मंडळ रिस.
• ठिकाण : मु. रिस, ता. खालापूर, जि. रायगड.