प्रेस मीडिया लाईव्ह
विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील
मनसेचे दीपक कांबळी यांवगा पाठपुरावा व प्रेस मीडिया लाईव्हच्या वृत्ताची दखल घेऊन प्रिआ शाळा परिसरातील संपूर्ण रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात आले.
या अगोदर मनसेचे दीपक कांबळे यांनी प्रेस मीडिया लाईव्ह विशेष प्रतिनिधी सुनील पाटील यांच्याकडे पातळगंगा एमआयडीसी श्री राऊत साहेब मोहपाडा प्रिया स्कूल अंतर्गत रस्त्याचे नादुरुस्ती झाली होती त्या दरम्यान बातमी प्रसिद्ध करण्यात सांगितले असताना बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती त्या बातमीच्या अनुषंगाने आणि दीपक कांबळे यांच्या पुढाकाराने व त्यांच्या सहकार्याने रस्त्याचे काम लवकरात लवकर करण्यात आले
पाताळगंगा एमआयडीसी यांची रहिवासी वसाहत मोहपाडा येथील संपूर्ण रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली होती.अनेक वर्षे येथील नागरिकांना तसेच प्रिआ शाळा व जनता विद्यालय यांच्या हजारो विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत होता.हि बाब मनसेचे दीपक कांबळी यांच्या निदर्शनास आली.त्यांनी मे २०२२ मध्ये एमआयडीसीचे तत्कालीन वरिष्ठ श्री.शिंदे साहेब यांना निवेदन दिले, परंतु पावसाळा जवळ असलेल्या कारणाने फक्त खड्डे बुजविण्यात आले.व पावसाळ्या नंतर संपूर्ण रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येईल असे आश्वासन दिले.त्या प्रमाणे आताचे वरिष्ठ अधिकारी मा. श्री.राऊत साहेब यांना निवेदन देण्यात आले.त्यांनी सकारात्मक भूमिका जलदगतीने कारवाई केली व संपूर्ण रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले.
परिसरातील सर्व नागरिकांनी मनसेचे दीपक कांबळी यांचे त्याच प्रमाणे श्री.शिंदे साहेब तसेच परिसरातील सर्व वृत्तपत्रांचे संपादक, पत्रकार यांचे विशेष आभार मानले