जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेतर्फे भजनांचे कार्येक्रम संपन्न
प्रेस मीडिया लाईव्ह
विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील
श्री क्षेत्र पंचायतन मंदिरात महाशिवरात्री उत्साहात साजरी,"जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेतर्फे भजनांचे आयोजन करण्यात आले होते. पनवेल 18 फेब्रुवारी 2023 रोजी महाशिवरात्री भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी श्री क्षेत्र पंचायतन मंदिर नढाळ येथे महाशिवरात्री निमित्त धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. पहाटे पासूनच भक्तांच्या गर्दीने मंदिर परिसर बम बम भोले च्या गजरात फुलून गेला होता.
यावेळी संस्थेचे संस्थापक आणि पनवेलचे मा.आदर्श नगराध्यक्ष श्री जे.एम.म्हात्रे साहेब , संस्थेचे अध्यक्ष आणि पनवेल महानगरपालिकेचे मा.विरोधी पक्ष नेते श्री.प्रितम जनार्दन म्हात्रे , श्री.अमाप्तशेठ म्हात्रे , सौ.ममताताई प्रितम म्हात्रे यांनी श्री शंकराचे दर्शन घेतले.