तहसीलदार कार्यालय खालापूर पाताळगंगा नदी आणि पर्यावरण संवर्धन चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने भारताचा स्वातंत्र्य अमृत महोत्सव



प्रेस मीडिया लाईव्ह

 विशेष प्रतिनिधी  : सुनील पाटील

  अंतर्गत " चला जाणूया नदीला... अभियान पाताळगंगा नदी अंतर्गत  शिबिर आयोजित करण्यात आले आहे.  वार बुधवार दिनांक ८ फेब्रुवारी २०२३ रोजी  ठिकाण -  पिल्लेज एचओसी कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालय मोहोपाडा खालापूर रायगड. येथे पार पडले .


प्रमुख अतिथी..

मा. श्री आयुब तांबोळी साहेब तहसीलदार खालापूर. यांनी मार्गदर्शन केले त्याच बरोबर सदर कार्यक्रमात मा.श्री.अश्वनाथ खेडकर साहेब पोलीस निरीक्षक रसायनी खालापूर , सौ उमाताई मुंढे मा.सभापती रायगड जिल्हा परिषद , मा. श्री.विठ्ठल पाचपुंडे साहेब सहअभियंता एमआयडीसी पाताळगंगा मा. श्री सुनील कदम साहेब   अध्यक्ष प्रीया असोशियशन पाताळगंगा रसायनी श्री संजीव बनोट रुची सोया पतंजली पाताळगंगासौ लता मेनोन प्राचार्य पील्लेज  महाविद्यालय , श्री अभिजीत लोहिया महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, श्री विठ्ठल पाचपुंडे साहेब सहअभियंता  एमआयडीसी पाताळगंगा मा.श्री विपीन चौहान व्ही आर मेटेल प्रा. ली.श्री राजेश पाटील मा. सरपंच माजगाव अमित देवघरे उपस्थितीत होते.

 या कार्यक्रमाचे आयोजक आहेत श्री अरुण गोविंद जाधव , अध्यक्ष - पाताळगंगा नदी आणि पर्यावरण संवर्धन चॅरिटेबल ट्रस्ट पाताळगंगा नदी चे वाढते प्रदूषण लक्षात घेऊन सदर कार्यक्रम चला जानुया नदीला अभियान अंतर्गत पाताळगंगा नदी संवाद शिबिर आयोजित करण्यात आले त्या वेळी उपस्थितीत प्रमुख पाहुणे  श्री आयुब तांबोळी साहेब यांनी तरुण वर्गाला विद्यार्थी यांना नदीची माहिती व तिचे महत्व वाढते प्रदूषण या वर  मोलाचं सल्ला आणि नदीची काळजी घेणे तिचे संवर्धन करणे का महत्वाचं आहे या बद्दल माहिती देण्यात आली.

Post a Comment

Previous Post Next Post