प्रकृती अस्वस्थामुळे कसबा पोटनिवडणुकीच्या प्रचारातून खासदार गिरिश बापट यांनी माघार घेतली.


प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : खासदार गिरिश बापट यांनी कसबा विधानसभा मतदारसंघाच्या जाहीर प्रचारातून माघार घेतली आहे.“प्रकृती अस्वस्थामुळे कसबा पोटनिवडणुकीच्या प्रचारातून माघात घेत आहोत’ असे बापट यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे, कसबा विधानसभा मतदारसंघात भाजपला मोठा धक्का बसला असून गितिष्र बापट यांच्या माघारीने उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे. 

गिरीश बापट यांच्या प्रकृतीचे कारण देत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंग़ळवारी सायंकाळी खासदार गिरिश बापट यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. तसेच प्रकृतीमुळे ते निवडणुकीचा प्रचारात उतरू शकत नसले तरी, निवडणुकीकडे त्यांचे बारीक लक्ष आहे. त्यामुळे कसबा असो किंवा चिंचवड भाजप दोन्ही ठिकाणी निवडून येईल, असा  ठाम विश्‍वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

खासदार गिरिश बापट गेल्या काही महिन्यांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होत नाहीत. त्यातच, हा मतदारसंघ बांधण्यात त्याचा मोठा वाटा असल्याने भाजपला या निवडणूकीत बापट यांची जनसंपर्क, कार्यकर्त्यांची फळी, निवडणूकीची गणिते जुळविण्यासाठी गरज होती. त्या अनुषंगाने काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही बापट यांची भेट घेतली होती. त्यावेळी, कसब्याची काळजी करू नका असे आश्‍वासन बापट यांनी दिले होते.

Post a Comment

Previous Post Next Post