प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : इनक्रेडिबल समाजसेवक ग्रुपतर्फे पालिकेच्या महिला सफाई कामगारांसाठी कोंढवा येथे आयोजित हळदी- कुंकू समारंभाला बुधवारी चांगला प्रतिसाद मिळाला. दि . 2 फेब्रुवारीफेब्रुवारी रोजी इनक्रेडीबल समाजसेवक ग्रृप तर्फे कोंढवा भागातील पालिकेच्या घनकचरा विभागासाठी रस्त्यांची सफाई, झाडलोट करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांसाठी हळदी कुंकू समारंभ आयोजित करण्यात आला होता.
मिठानगर भागात प्रथमच हा अनोखा हळदी कुंकू समारंभ पार पडला. भारतीय संविधाना नुसार एकता आणि बंधुता याचे प्रतीक डोळ्यासमोर ठेवून हिंदू - मुस्लिम भाईचारा तसेच धर्माचे आदर हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून सदरचा कार्यक्रम राबविला.
या कार्यक्रमात मिठानगर कोठी,कौसर बाग तसेच लुल्ला नगर कोठीच्या महिला कामगारांनी यात सहभाग घेतला. तसेच स्थानिक महिलांनी देखील या कार्यक्रमात उत्फुर्त सहभाग नोंदविला. उपस्थित महिलांसाठी चहापान समारंभ झाला, तसेच मेंदीचे कोन भेट देण्यात आले..
इनक्रेडीबल समाजसेवक ग्रृप चे पदाधिकारी सचिन अल्हाट यांनी राईट टू एज्युकेशन कायद्याची माहिती दिली तर इनक्रेडीबल समाजसेवक ग्रृप चे संस्थापक अध्यक्ष -असलम इसाक बागवान यांनी महिला सबलीकरण तसेच महिला अधिकार याची माहिती दिली.