राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना राज्यपाल पदावरून हटविल्याबद्दल पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आनंद साजरा केला.

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : वादग्रस्त राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा अखेर राजीनामा मंजूर करून त्यांना राज्यपाल पदावरून हटविल्याबद्दल पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने पर्वती येथे उत्साहात आनंद साजरा केला.

महाराष्ट्राच्या राज्यपालांना महाराष्ट्र व मराठी माणसांच्या भावनांची अजिबात जाणिव नाही अशीच त्यांची आजवरची वागणूक पाहता दिसून येते . छत्रपती शिवराय, क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्याबद्दल सातत्याने अवमानास्पद वक्तव्ये करुन त्यांनी सर्व मर्यादांचे उल्लंघन केले आहे. आज त्यांना हटविण्याचा आनंद राज्यातील सर्वच जनतेला झाला आहे , तरी ही जर राज्यातील शिंदे फडणवीस सरकारला महापुरुषांबद्दल अस्मिता असती तर त्यांनी वेळीच राज्यपालांची हकालपट्टी केली असती आणि आजचा हा जल्लोष अधिक मोठा करता आला असता , परंतु त्यांनी तसे केले नाही.अखेर राज्यपालांनी स्वतः च निवृत्ती मागितल्यानंतर केंद्र सरकारने अखेर आज त्यांना पदावरून हटविले आहे.

या प्रसंगी माझ्या समवेत मा.नगरसेविका प्रियाताई गदादे, पर्वती विधानसभा अध्यक्ष संतोष नांगरे विपुल म्हैसुरकर , मृणालिनीताई वाणी ,किशोर कांबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post