जी -२० संयोजन समिती अध्यक्षपदी नियुक्ती
प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : अली दारूवाला यांची भारतीय जनता पार्टीचा प्रवक्ता आणि टीव्ही पॅनेल सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे .पुण्यात या वर्षी डिसेंबर २०२३ पर्यंत होणाऱ्या जी -20 शिखर परिषदेसाठी भाजपाच्या पुणे संयोजन समितीचे अध्यक्ष म्हणूनही नियुक्ती करण्यात आली आहे.
राजेश पांडे यांची भाजपसाठी संपूर्ण महाराष्ट्रासाठी जी -20 शिखर परिषद संयोजन समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अली दारूवाला आणि राजेश पांडे यांना शुभेच्छा दिल्या. अली दारूवाला ऑल इंडिया पेट्रोल डीलर्स असोसिएशन (AIPDA) चे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मुस्लिम राष्ट्रीय मंच (MRM) चे , राष्ट्रीय सह संयोजक आहेत. या मंचाचे अध्यक्ष इंद्रेश कुमार , राष्ट्रीय स्वयंसेवक संघा चे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य (नवी दिल्ली ) हे आहेत .