प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : कसबा विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना वाढता पाठींबा मिळत आहे. ‘ऑल इंडिया जमीयतुल कुरेश एक्शन कमेटी, सोलापूर जिल्हा जिव्हाळा प्रतिष्ठान पुणे, नदाफ,पिंजारी,मन्सुरी मुस्लीम जमात, पुणे शहर व जिल्हा, बागबान समाज सेवा संस्था, पुणे,‘रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(डेमोक्रॅटिक)’ आणि ‘बहुजन जनता दल’यांनी रवींद्र धंगेकर यांना पाठिंब्याची पत्रे दिली आहेत.
१. ‘ऑल इंडिया जमीयतुल कुरेश एक्शन कमेटी’चे पुणे शहर जिल्हा अध्यक्ष, हसन अब्बास कुरेशी यांनी कसबा मतदारसंघातील रवींद्र धंगेकर आणि पिंपरी चिंचवड येथील नाना काटे यांना जाहीर पाठींबा दिला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, “केवळ आपले विचार आणि देशहितासाठी असलेले आपले सामाजिक संतुलन राखण्याचे कसब या बाबींचा विचार करून आपल्या नेतृत्वातील वर नमूद दोन्ही उमेदवारांना या पत्रान्वये जाहीर पाठींबा देत आहोत..
‘सोलापूर जिल्हा जिव्हाळा प्रतिष्ठान’, पुणे तर्फे रवींद्र धंगेकर यांना पाठींब्याबद्दल लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, “सोलापूर जिल्ह्यातील पुण्यात स्थायिक असलेल्या विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या बैठकीत एकमताने निर्णय झाला असून कसबा मतदारसंघात छोट्या-मोठ्या वस्त्यात सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांचे प्रमाण जास्त आहे. तन-मन-धनाने सर्वसामान्यांसाठी झटणाऱ्या कार्यकर्त्याला विधानसभेत संधी देण्यासाठी रवींद्र धंगेकर यांच्या पाठीशी खंबीर उभे राहावे असे आवाहन करण्यात येत आहे.” या पत्रावर प्रा.किरण गायकवाड(अध्यक्ष), सुनील नागटिळक, राहुल तुपेरे, विक्रम कसबे, अॅड.देवेंद्र वाळके आणि शांताराम उदागे यांच्या सह्या आहेत.
‘नदाफ,पिंजारी,मन्सुरी मुस्लीम जमात, पुणे शहर व जिल्हा’चे
अध्यक्ष अनिस अजिज पिंजारी यांनी धंगेकर यांना पाठींब्याबाबत लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, “धंगेकर यांना विजयी करण्याचे समाजाकडून निश्चित करण्यात आले आहे. याकरता नदाफ पिंजारी मुस्लीम जमात (पुणे शहर)च्या वतीने आपणास जाहीर पाठींबा जाहीर करत आहोत. पिंजारी ही जमात कापसाच्या उश्या, गाद्या बनविण्याचे काम पिढ्यानपिढ्या पासून करतात. या भागामध्ये आमच्या समाजाचे ४००० ते ४५०० लोक राहत असून आमच्या विभागात रवींद्र धंगेकर यांनी केलेल्या चांगल्या कामाचा अनुभव आम्हाला असल्यामुळे कॉंग्रेस पक्षाला व रवींद्रभाऊ धंगेकर यांना आमच्या सर्वांचा जाहीर पाठींबा आहे.”
४. ‘बागबान समाज सेवा संस्था, पुणे ’ तर्फे धंगेकर यांना पाठींब्याबाबत लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, “रवींद्र धंगेकर यांना आमचा पूर्ण पाठींबा असून, त्यांना पुढील; कारकीर्दीस हार्दिक शुभेच्छा असे संस्थेचे अध्यक्ष जावेद इस्माईल बागवान यांनी म्हटले आहे.”
५. ‘रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(डेमोक्रॅटिक)’तर्फे पाठींब्याबाबत शहर कॉंग्रेस अध्यक्ष अरविंद शिंदे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, “पक्षाच्या टी.एम कांबळे गटातर्फे महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर यांना जाहीर पाठींबा देत आहोत. आमचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते महाविकास आघाडीच्या उमेदवारास निवडून आणण्यासाठी जोमाने काम करू, तसेच पक्षाच्या वतीने जाहीर पाठींबा असल्याचे घोषित करत आहोत.” या पत्रावर संजय कदम(जिल्हा अध्यक्ष), अरविंद बगाडे(अध्यक्ष,पुणे शहर), शैलेन्द्र जाधव(कार्याध्यक्ष, पुणे शहर), समीरभाई शेख(युवक अध्यक्ष, पुणे शहर), दीपक सावंत (उपाध्यक्ष, पुणे शहर) यांच्या सह्या आहेत.
६. ‘बहुजन जनता दल’ तर्फे पाठींब्याबाबत रवींद्र धंगेकर यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, ”आम्ही पूर्ण पाठींबा देत असून, या मतदार संघात दलित बहुजन या मतदाराचे मतदान विभाजन टाळण्यासाठी आमच्या बहुजन जनता दल पक्षाकडून जाहीर पाठींबा देत आहोत. बहुजन जनता दल पक्षाच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये रवींद्र धंगेकर यांना विजयी करण्यासाठी सहकार्य करावे.” असे आवाहन संस्थापक अध्यक्ष पंडितभाऊ दाभाडे यांनी केले आहे.