प्रेस मीडिया लाईव्ह :
शहरातील वाढत्या गुन्ह्यांना पायबंद घालण्यासोबतच पोलीस आयुक्त रितेश कुमार व सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गुन्हे शाखा तसेच स्थानिक पोलिसांना सूचना तसेच मार्गदर्शन केले आहे. त्यानूसार गुन्हेगारांवर वचक बसविण्यासाठी पोलिसांनी जोरदार कंबर कसली आहे. गुन्हेगारांची झाडाझडती तसेच त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे. प्रत्येक गुन्हेगाराला पोलीस ठाण्यात बोलवून चौकशी केली जात आहे. पोलिसांनी शहरातील तब्बल 23 हजार गुन्हेगारांची यादी तयारकरून त्याद्वारे त्यांच्यावर अंकुश आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. मालमत्ता तसेच शरिराविरूद्धचे गुन्हेगारांचे वर्गीकरणकरून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यावर जोर दिला जात आहे.
पोलिसांनी आतापर्यंत शहरातील तब्बल 10 हजार 973 गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली. तर शहरातील गुंडाच्या 12 टोळ्यांवर कारवाई केली असून, त्यात 75 गुन्हेगारांचा समावेश आहे. तर, चौघांना विविध कारागृहात स्थानबद्ध केले आहे. तर 43 जणांवर तडीपारीची कारवाई केली आहे.