बंडखोरांना शांत करण्याचं आव्हान काँग्रेस, राष्ट्रवादी समोर



प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे. : कसबा आणि पिंपरी चिंचवडच्या पोटनिवडणुकीची अर्ज दाखल करण्याची मुदत संपलीय. आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीत बंडखोरी झालीय. भाजपलाही हिंदू महासभेमुळे समविचारी बंडखोरीचा सामना करावा लागणार आहे. कारण कसब्यातून हिंदू महासंघाचे उमेदवार आनंद दवे यांनी देखील अर्ज दाखल केला आहे. 

चिंचवडमध्ये राष्ट्रवादीकडून ऐनवेळी नाना काटे यांना उमेदवारी मिळाली. त्यामुळे राहुल कलाटे नाराज झाले. त्यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. कसब्यातून काँग्रेसचे बाळासाहेब दाभेकर यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज भरला आहे. पण काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं बंडखोरीमुळं टेन्शन वाढलंय. 10 तारखेपर्यंत माघार घेण्याची मुदत आहे. त्यामुळं आधी बंडखोरांना शांत करण्याचं आव्हान काँग्रेस, राष्ट्रवादीसमोर आहे.

Post a Comment

Previous Post Next Post