बागवे पिता-पुत्रांची नाराजी समजतात भाजप कडून अविनाश बागवे यांना तातडीने संपर्क करण्यात आला.
प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे :. विधानपरिषद निवडणुकीनंतर राज्यात पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकांची रणधुमाळी पाहायला मिळत आहे .स्थायी समितीचे माजी अध्यक्ष आणि पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे नगरसेवक रशीद शेख यांनी भाजपातून काँग्रेस मध्ये प्रवेश केला. त्या मुळे काँग्रेस मधील अंतर्गत नाराजीचे सुर आता दिसू लागलेत
रशीद शेख यांचा मुस्लिम समाजात चांगला प्रभाव आहे. त्याचा फटका रमेश बागवे यांना 2019 च्या विधानसभेच्या निवडणुकीत झाला. या निवडणुकीत बागवे यांचा सुमारे साडेपाच हजार मतांनी पराभव झाला. त्यामुळे शेख यांना पुन्हा काँग्रेस मध्ये घेण्यास बागवे यांचा विरोध होता. त्यामुळे बागवे यांना आधी कसलीच कल्पना न देता आज थेट काँग्रेस भवनात पटोले यांच्या उपस्थितीत शेख यांना प्रवेश देण्यात आला.ज्या रशीद शेख यांच्यामुळे 2019 च्या निवडणुकीत बागवे यांचा साडेपाच हजार मतांनी पराभव झाला त्यांना पक्षात घेऊ नये, अशी भूमिका बागवे यांनी घेतली. मात्र ऐनवेळी कार्यक्रमाच्या ठिकाणी बोलवण्यात आले आणि प्रवेश घेण्यात आला. बागवे हे केली सुमारे पाच वर्ष काँग्रेसचे अध्यक्ष होते.
बागवे यांचे चिरंजीव अविनाश बागवे हे देखील तीन टर्म काँग्रेसचे नगरसेवक आहेत. रशिद शेख यांच्या प्रवेशाने नाराज झालेल्या बागवे पिता-पुत्रांची नाराजी समजतात भाजपकडून अविनाश बागवे यांना तातडीने आज संपर्क करण्यात आला.दुसरीकडे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या निवासस्थानी रविवारी रात्री नाना पटोले तसेच अशोक चव्हाण यांच्यासह काँग्रेसच्या काही नेत्यांसाठी भोजनाचा कार्यक्रम होता. या ठिकाणी देखील रमेश बागवे यांना बोलवण्यात आले. मात्र, त्यांनी तेथे जाण्याचे टाळले. त्यांना फोन करून बोलवण्यात आले. मात्र बागवे यांनी प्रतिसाद दिला नाही.