खासगी बसमधून अनधिकृतरित्या मालवाहतूक आणि दुचाकींची वाहतूक करणार्‍या तब्बल 65 बस गाड्यांवर कारवाई


प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : खासगी बसमधून अनधिकृतरित्या मालवाहतूक आणि दुचाकींची वाहतूक करणार्‍या तब्बल 65 बस गाड्यांवर कारवाई करण्यात आली आहे.या मोहिमेदरम्यान आरटीओने 122 खासगी बसची तपासणी केली. त्यातील 65 बसमध्ये अनधिकृतरित्या मालवाहतूक होत असल्याचे समोर आले.

पुणे शहरात प्रवाशांची वाहतूक करणार्‍या खासगी बस मधून  सरासपणे अनधिकृतरित्या दुचाकींची आणि मालाची वाहतूक सुरू आहे त्यामुळे पुणे आरटीओकडून खासगी बस तपासणीची जोरदार  मोहिम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेदरम्यान आरटीओ अधिकार्‍यांच्या अनधिकृत मालवाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले आहे. तपास मोहिमेवर असलेल्या आरटीओच्या वायुवेग पथकांनी जानेवारी आणि फेब्रुवारी 2023 या काळात या खासगी बस गाड्यांवर कारवाई करण्यात आली आहे.



Post a Comment

Previous Post Next Post