आता हे प्रकरण कुठपर्यंत जातं ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.
प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : कसबा आणि पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आलेला आहे या पोटनिवडणुकीत उमेदवारी देण्यापासून ते प्रचारापर्यंत आणि प्रचाराची मुदत संपल्यानंतरही जोरदार घडामोडी घडत आहेत. काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजपचे नेते आणि पदाधिकारी पोलिसांच्या समोर पैसे वाटत असल्याचा गंभीर आरोप धंगेकर यांनी केला आहे . या आरोपांवरुन त्यांनी आज उपोषण देखील केलं. त्यांच्या या आरोपांवरुन अपक्ष उमेदवार अभिजीत बिचुकले यांनी ही पोटनिवडणूक रद्द करण्याची थेट मागणी केल्याने राजकीय गोठात जोरदार खळबळ उडाली आहे.
“मला निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना सांगायचं आहे की, निवडणूक आयोगाचे कॅमेरेमन मला कुठेही फिरताना दिसले नाहीत. संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत कॅमेरेमन असतात. पण त्यांचे कॅमेरेमन मला दिसले नाहीत. इथले निवडणूक निर्णय अधिकारी हे राजकीय नेत्यांच्या साथीला आहेत असं समजावं?”, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तर दुसरीकडे रवींद्र धंगेकर यांनी केलेल्या आरोपांनंतर भाजपदेखील आक्रमक झालीय. भाजप नेत्यांनी पोलीस आयुक्तालयात जाऊन धंगेकरांची तक्रार केलीय. रवींद्र धंगेकर यांनी प्रचाराची वेळ संपलेली असताना खोटे आरोप करत आंदोलनाच्या माध्यमातून निवडणुकीचा प्रचार केला. त्यामुळे त्यांची उमेदवारी रद्द करण्यात यावी. त्यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी भाजपच्या शिष्टमंडळाने पुणे पोलीस आयुक्तांकडे केली.त्यामुळे आता हे प्रकरण कुठपर्यंत जातं ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.