कसबा मतदार संघ पोट निवडणुक मतदानासाठी पैसे घेतले नाही म्हणून भाजपच्या माजी नगरसेवकाने केली मारहाण


प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे :   गंजपेठ भागात भाजपचे माजी नगरसेवक विष्णू अप्पा हरिहर यांनी नागरिकांना मारहाण केल्याचा खळबळजनक प्रकार घडला आहे. शनिवारी दुपारी पैसे वाटत असताना हरिहर यांना अडवल्या प्रकरणी बदला घेण्याच्या भावनेने रात्री 25 ते 30 लोक येऊन गंज पेठ 630 येथे राहणाऱ्या लोकांना शिविगाळ करत मारहाण केली. अशी माहिती तिथे राहणाऱ्या नागरिकांनी व काँग्रेसचे माजी आमदार रमेश बागवे यांनी दिली. रमेश बागवे यांच्या सांगण्यानुसार या प्रकरणी पोलिसात तक्रार देऊन गुन्हा दाखल केला आहे. कसबा पोटनिवडणूकीचे वातावरण चांगलेच तापले असल्याचे दिसून येत आहे. कसबा मतदार संघ पोट निवडणुक  मतदानासाठी  पैसे घेतले नाही म्हणून भाजपच्या माजी नगरसेवकाने केली मारहाण

या प्रकरणाची माहिती देत असताना रमेश बागवे म्हणले की, 630 कसबा या भागामध्ये भाजपचे नगरसेवक व त्यांच्या साथीदार पैसे वाटत असताना त्यांना स्थानिकांनी विरोध केला. यामुळे त्यांनी तिथे बेदम मारहाण केली आहे. आमच्या महिला भगीनींना लाथा बुक्काने मारहाण केली आहे. हा प्रकार निंदनीय आहे. त्यासोबत जातीवाचक शिव्या दिल्या आहेत. तुम्हाला इथे राहण्याचा अधिकार नाही, अशा धमक्या सुद्धा दिल्या आहेत. याबाबत पोलीस ठाण्यात आम्ही तक्रार देण्यात आली आहे. वरिष्ठ अधिकारी गुन्हा दाखल करण्याच काम करत आहे, अशी माहिती माजी मंत्री रमेश बागवे यांनी दिली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post