राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपाली पाटील-ठोंबरे यांची रासने यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची निवडणूक आयोगाकडे मागणी केली


प्रेस मीडिया लाईव्ह :

 भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांनी मतदानाचा हक्क बजावला  पण मतदानासाठी आलेल्या रासने यांनी गळ्यामध्ये भाजपचे चिन्ह असलेली मफलर घातली होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपाली पाटील-ठोंबरे यांनी हाच मुद्दा पकडून रासने यांच्यावर निशाणा साधला व त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली .

कसब्यात महाविकास आघाडी आणि भाजप मध्ये लढत चांगलीच रंगलेली पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी सकाळी 7 वाजता मतदान करून आपला हक्क बाजवला, त्यासोबत भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांनी देखील नुमवि शाळेत जाऊ मतदान केले. मात्र, हेमंत रासने यांनी मतदान करत असताना गळ्यात भाजपचे चिन्ह असलेली मफलर घातली होती.रासने यांनी जाणीव पूर्वक मतदान केंद्रामध्ये गळ्यात भाजपची मफलर घालून  मतदान केले. हा आचारसंहिताचा भंग आहे. त्यांच्यावर त्वरित गुन्हा दाखल झाला पाहिजे. आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या लोकांनी पहिले यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची  थोडी तसदी घ्यावी. 

दरम्यान, रुपाली पाटील-ठोंबरे यांच्या आरोपांना रासने यांनी उत्तर दिले आहे.मतदानाला लवकर पोहोचण्याच्या घाईत अनावधानाने गळ्यामध्ये भाजपचे चिन्ह असलेली मफलर राहिली. 


Post a Comment

Previous Post Next Post