प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : गिरीश बापट यांनी आजारपणामुळे प्रचारात सहभागी होणार नसल्याचं सांगितलं होतं. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रात्री गिरीश बापट यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी प्रचारात सहभागी होण्याचा निर्णय घेतला असल्याचं बोललं जात आहे.खासदार गिरीश बापट आणि संजय काकडे या दोघांच्या काल भाजप नेत्यांनी भेटी घेतल्यावर या दोघांनीही कसबा पेठ मतदार संघातील निवडणुकीत सक्रिय होण्याचा निर्णय घेतला आहे. खासदार गिरीश बापटांच्या अध्यक्षतेखाली टिळक कुटुंबीयांच्या केसरी वाड्यात भाजप पदाधिकार्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आलं आहे. संध्याकाळी पाच वाजता ही बैठक होणार आहे. मुक्ता टिळक यांचे कुटुंबीय देखील या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
कसबा मतदार संघाची पोटनिवडणूक जिंकण्यासाठी भाजपकडून जोरदार तयारी सुरु आहे. त्यासाठी कालपासून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यात आहेत. प्रचाराची रणनीती आणि पोटनिवडणुकीचं नियोजन करण्यासाठी बैठकींचं सत्र सुरु आहे. काल देवेंद्र फडणवीसांनी गिरीश बापट यांची घोले रोड परिसरात भेट घेतली. त्यासोबतच त्यांनी अनेक नेत्यांच्या आणि पदाधिकाऱ्यांचीदेखील भेट घेतली. या भेटीनंतर गिरीश बापट आजारी असूनही प्रचारासाठी मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे.त्यामुळे भाजपला दिलासा मिळाला आहे.