‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटची सर्वात मोठी अभिवादन मिरवणूक काढण्यात आली.

शिवजयंतीदिनाची  अभिवादन मिरवणूक ठरली आहे .एकूण ९ हजार विद्यार्थी या मिरवणुकीत सहभागी झाले होते


प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : ‘महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त विद्यार्थ्याच्या भव्य अभिवादन मिरवणुकीचे विशेष आयोजन करण्यात आले होते. रविवार, दि. १९ फेब्रुवारी  २०२३ रोजी सकाळी साडेआठ वाजता संस्थेचे अध्यक्ष तसेच 'डॉ.पी.ए. इनामदार विद्यापीठा 'चे कुलपती डॉ. पी.ए.इनामदार यांच्या हस्ते मिरवणुकीस प्रारंभ झाला.

  एम.सी.ई सोसायटीचे सचिव प्रा. इरफान शेख , एस.ए. इनामदार, शाहीद इनामदार, वहाब शेख, साबीर शेख , असीफ शेख,शाहीद शेख, बबलू सय्यद,तसेच विश्वस्त, पदाधिकारी, प्राद्यापक -शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले. हाजी गुलाम महमद आझम एज्युकेशन ट्रस्ट, महाराष्ट्र मेडिकल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च सेंटर, गोल्डन ज्युबिली एज्युकेशन ट्रस्ट, डेक्कन मुस्लीम इन्स्टिट्यूट अॅण्ड लायब्ररी, अवामी महाझ या संस्थांनी सहभाग घेतला.




पुण्यातील अल्पसंख्य, बहुजन समाजातील विद्यार्थी  यांचा सहभाग असलेली ही सर्वात मोठी  शिवजयंतीदिनाची  अभिवादन मिरवणूक ठरली आहे .एकूण ९ हजार विद्यार्थी या मिरवणुकीत सहभागी झाले होते मिरवणुकीचे हे २२ वे वर्ष होते.

आझम कॅम्पस ते लाल महाल असा या मिरवणुकीचा मार्ग होता.  पूना कॉलेज, गोल्डन ज्युबिली टेक्नीकल इन्स्टिट्युट, जूना मोटर स्टँड, पद्मजी पोलिस चौकी, क्वार्टर गेट, संत नरपतगीरी चौक, नाना चावडी चौक, अरुणा चौक, अल्पना टॉकीज, डुल्या मारूती चौक, तांबोळी मशीद, सोन्या मारुती चौक, मोती चौक, फडके चौक मार्गे लाल महाल येथे मिरवणुकीची सांगता झाली. 

मिरवणूकीत आझम कॅम्पस परिवारातील विद्यार्थी, शैक्षणिक संस्थांचे सर्व प्राचार्य, पदाधिकारी, कर्मचारी, दरबार ब्रास बॅण्डची दोन पथके, ढोल-ताशांचे पथक, शोभीवंत बैलगाडीत शिवाजी महाराजांचा जिवंत देखावा, तुतारी, नगारे देखील सहभागी झाले होते .दरवर्षी संस्थेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महंमद पैगंबर यांना अभिवादन करण्यासाठी भव्य मिरवणुका काढल्या जातात, अशी माहिती प्रसिध्दी पत्रकाद्वारे देण्यात आली.

Post a Comment

Previous Post Next Post