प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीतील महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री. हेमंतजी रासने यांच्या प्रचाराचा शुभारंभ वने आणि सांस्कृतिक कार्य मंत्री मा. सुधीरजी मुनगंटीवार आणि मा. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.
ओंकारेश्वर मंदिरात शंभू महादेवाचे दर्शन घेऊन प्रचाराची झालेली उर्जादायी सुरूवात कसब्यातील घराघरात कमळ फुलविणारी ठरेल, हा विश्वास देणारी आहे.यावेळी लोकजनशक्ती पार्टी (रामविलास) राष्ट्रीय अध्यक्ष- मा.खा. चिराग जी पासवान साहेब, प्रदेशाध्यक्ष - शमीम हवा , यांच्या आदेशावरून कसबा पोट निवडणुकीत अधिकृत उमेदवार हेमंत जी रासने यांना पाठिंबा दिला..
यावेळी वने आणि सांस्कृतिक कार्य मंत्री मा. सुधीरजी मुनगंटीवार ,पालकमंत्री मा. चंद्रकांतदादा पाटील, शहराध्यक्ष जगदीश मुळीक, मा. सभागृह नेते धीरज घाटे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, आमदार माधुरीताई मिसाळ. लोक जनशक्ती पार्टी रामविलास.(पुणे)शहर व जिल्हाध्यक्षसंजय भाऊ आल्हाट,महाराष्ट्र प्रदेश चिटणीस अमर पुणेकर, पुणे जिल्हा कार्याध्यक्ष शरद टेमगिरे, , पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस केसी पवार, पुणे शहर सरचिटणीस सचिन अहिरे, शिरूर तालुका अध्यक्ष तुषार ननवरे, पुणे जिल्हा प्रवक्ते पत्रकार निलेश जगताप, कसबा मतदारसंघाचे अध्यक्ष तय्यब शेख उपाध्यक्ष समीर पठाण, सरचिटणीस युवा आघाडी आदिनाथ भाकरे, संघटक राहुल उभे*, *शिवाजीनगर मतदार संघाचे अध्यक्ष रणजीत सोनावळे, लीगल सेना अध्यक्ष एडवोकेट अमित दरेकर, वडगाव शेरी मतदार संघाचे अध्यक्ष संतोष पिल्ले, राजेश पीवाल श्यामपाशी व इतर मान्यवर पाठिंबासाठी उपस्थित होते..