पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या १७ व्या वर्धापनदिना निम्मित मनसे पुणे शहराच्या वतीने कला क्रीडा महोत्सव संपूर्ण पुणे शहरात मोठया उत्साहात पार पडत आहे.



प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे :  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या १७ व्या वर्धापनदिना निम्मित मनसे पुणे शहराच्या वतीने कला क्रीडा महोत्सव संपूर्ण पुणे शहरात मोठया उत्साहात पार पडत आहे.महाराष्ट्र नवनिर्माण हडपसर विधानसभेच्या वतीने भव्य जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.सदर स्पर्धा ही आज पासून तीन दिवस चालणार आहे.पुणे शहरातील विविध स्पर्धेकांनी ह्या स्पर्धेत सहभाग घेतला आहे.

         उदघाटन प्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राजेंद्र बाबू वागसकर,सरचिटणीस वसंत मोरे, सरचिटणीस रणजित शिरोळे,मनसे प्रवक्ते योगेश खैरे,सरचिटणीस किशोर शिंदे, मा.गणेश आप्पा सातपुते, विध्यार्थी सेना अध्यक्ष अमोल शिंदे,नारायण लांडगे सर,डॉ. विनोद शेठ,डॉ.रैना,डॉ.मुनाफ इनामदार, ह.भ.प. मोहनजी ढवळे, ह.भ.प.सुदामराव वांजळे तसेच विविध पदाधिकारी, महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.या स्पर्धेचे उत्कृष्ट असे आयोजन विभाग अध्यक्ष मा.अमोल शिरस आणि पदाधिकारी यांनी केले होते.

Post a Comment

Previous Post Next Post