पांगरताटी येथील घटना : सात आरोपींना अटक
प्रेस मीडिया लाईव्ह :
पातूर तालुका .प्रतिनिधी : राहुल सोनोने ( मळसुर)
जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेले पातुर तालुक्यातील अतिदुर्ग भागातील पांगरताटी येथे दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना शुक्रवार दि.१७ फेब्रुवारी रोजीच्या रात्री १० वाजताच्या सुमारास घडली,
मळसूर येथील एक तरुण उधारी मागण्यासाठी पांगरताटी येथे गेला असता, त्यांच्यासोबत वाद झाला, त्या तरुणांनी आपल्या सहकाऱ्यांना बोलावले आणि नंतर दोन्ही गटात दगड लाठ्या काठ्याने तुंबळ हाणामारी झाली,मळसुर येथील तरुणांनी आदिवासी महिलांना घरात घुसून मारहाण करून घरातील साहित्याची फेकफाक केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. दोन्ही गटातील परस्पर तक्रारीवरून चान्नी पोलिसांनी अमर कांकाळ,याकूब कुरैशी,प्रवेश थीटे,सागर सुर्वे, प्रेमदास चव्हाण, अरुण चोंढकर,जितेंद्र चव्हाण असे एकूण ११ आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून रात्री उशिरा सात आरोपींना अटक करून शनिवार रोजी पातुर न्यायालयात हजर केले असता, दोन्ही गटातील सातही आरोपींचा जामीन न्यायालयाने मंजूर केला असून, मळसूर येथील दोन आरोपी फरार आहे. पुढील तपास गणेश महाजन करीत आहे.