प्रेस मीडिया लाईव्ह :
राहुल सोनोने (मळसुर)
पातूर तालुक्यातील येथील मळसूर येथे श्री क्षेत्र सोपीनाथ महाराज संस्थानचा यात्रा महोत्सव उत्साहात साजरा होत आहे. मळसूर येथील श्री सोपीनाथ महाराज मंदीरात भक्तांची अलोट गर्दी होत आहे.
पातूर तालुक्यातील मळसूर येथे धार्मिक उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे करण्यात येत असून पाच आठवडे येथे यात्रेचे आयोजन करण्यात येते. भाविकांचे श्रद्धा स्थान असलेले हे जागृत मंदिर म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात श्री सोपीनाथ महाराज मंदिराची ख्याती आहे. महाराष्ट्रातील विविध भागातून भाविक येथे दर्शन घेण्यास वर्षभर येतात. मात्र जानेवारी ते फेब्रुवारी महीण्यात प्रत्येक सोमवारी असे पाच सोमवारी यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते.. याही वर्षी ३० जानेवारी पासून २७ फेब्रुवारी पर्यंत यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या काळात मंदिरात दररोज विविध मान्यवरांच्या हस्ते श्री सोपीनाथ महाराजांची आरती करण्यात येते
येथे प्रत्येक सोमवारी भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत आहेत. चान्नी, पातूर, वाडेगाव या भागात जागृत देवस्थान म्हणुन हे मंदिर प्रसिद्ध झाले. नवरात्र महोत्सवात दरम्यान दररोज फक्त आयोजन येथे केले जाते. मंदिरात आरती, भजन, प्रवचन, भागवत, अग्निपरीक्षा इत्यादी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यावर्षी सुद्धा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून मोठी गर्दी उसळत आहे. यात्रे दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून चान्नी पोलीस ठाण्याचे ठाणेदार योगेश वाघमारे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला आला आहे.