प्रेस मीडिया लाईव्ह
विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील
पनवेल : जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेचे अध्यक्ष आणि माजी. विरोधी पक्ष नेते प्रितम जनार्दन म्हात्रे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून व्ही के हायस्कूल पनवेल येथे भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात विविध 4 गटात 1600 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. सहभाग घेतलेल्या स्पर्धकांनी उत्कृष्ट प्रकारे आपली चित्र काढली होती. विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव मिळण्यासाठी संस्थेच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे सदर स्पर्धेचे आयोजन करण्यात येते.
चित्रकला स्पर्धेमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून द आर्ट सोसायटी ऑफ इंडियाचे माजी चेअरमन विक्रांत दत्तात्रेय शितोळे (आंतरराष्ट्रीय चित्रकार) हे उपस्थित होते. शिवजयंतीच्या निमित्ताने या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला त्यात प्रत्येक गटात प्रथम, द्वितीय आणि तृतीय तसेच उत्तेजनार्थ अशा प्रकारे बक्षिसे काढण्यात आली आहेत. त्यात प्रथम क्रमांक पटकावलेला स्पर्धकांची नावे पुढीलप्रमाणे
(गट क्रमांक-१ पहिली ते चौथी)
प्रथम क्रमांक आराध्या रमेश पाटील ४ थी डी.ए.वी. स्कूल,
(गट क्रमांक-२ पाचवी ते सातवी)
प्रथम क्रमांक कु. तमैका शांती निकेतन शाळा,
(गट क्रमांक-3 आठवी ते दहावी)
प्रथम क्रमांक कू.पार्थ रामचंद्र ढोबळे १०वी न्यू होरिजन स्कूल,
(गट क्रमांक- ४ अकरावी व त्यापुढील)
प्रथम क्रमांक
कु. प्रेरणा विद्यानंद वाकोडे पिल्लई कॉलेज या स्पर्धकांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. स्पर्धेमध्ये बक्षीस मिळवलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष प्रितम जनार्दन म्हात्रे यांनी अभिनंदन केले.