10 मार्चपर्यंत मान्य केलेल्या मागण्यांवर कार्यवाही झाली नाही तर 11 मार्चपासून पुन्हा काम बंद आंदोलन सुरू होईल

असा इशारा सेवक संयुक्त कृती समितीने राज्य सरकारला दिला आहे.


प्रेस मीडिया लाईव्ह :

 राज्यातील शिक्षकेतर कर्मचाऱयांच्या प्रलंबित मागण्यांबाबत जारी करण्यात आलेल्या इतिवृत्तात राज्य सरकारने अपेक्षित बदल केल्यानंतर मंगळवारी रात्री उशिरा राज्य विद्यापीठीय व महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समितीने 20 फेब्रुवारीपासून सुरू असलेले काम बंद आंदोलन स्थगित केले आहे, मात्र 10 मार्चपर्यंत मान्य केलेल्या मागण्यांवर कार्यवाही झाली नाही तर 11 मार्चपासून पुन्हा काम बंद आंदोलन सुरू होईल, असा इशारा सेवक संयुक्त कृती समितीने राज्य सरकारला दिला आहे.

 दोन फेब्रुवारीपासून राज्यातील विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱयांनी आपल्या मागण्यांसाठी आंदोलन सुरू केले. जवळपास 12 दिवसांनंतर 15 फेब्रुवारीला कृती समितीच्या शिष्टमंडळाची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबच चर्चा झाली. या चर्चेत कर्मचाऱयांच्या 6 पैकी 4 प्रमुख मागण्या मान्य करण्यात आल्या. त्याप्रमाणे राज्य सरकारकडून या चर्चेचे इतिवृत्त प्रसिद्ध होणे अपेक्षित होते, मात्र मागण्या मान्य झाल्याबाबत इतिवृत्तात स्पष्टता नसल्याने 20 फेब्रुवारीपासून बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय कृती समितीने कायम ठेवला. या आंदोलनाची झळ काही प्रमाणात 21 फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या बारावीच्या परीक्षांना बसली. त्यामुळे राज्य सरकारने मंगळवारी सुधारित इतिवृत्त जारी केले.

Post a Comment

Previous Post Next Post