प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - शिवज्योत आणण्यासाठी गेलेल्या कदमवाडी, भोसलेवाडी परिसरातील युवकांचा रजपुतवाडी जवळ अपघात झालाय. या अपघातात संतोष बाळासाहेब पाटील (वय 32, कदमवाडी) आणि अक्षय सुरेश पाडळकर (वय 24, भोसलेवाडी) या दोघांचा मृत्यू झालाय. मृत दोघा युवकांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सीपीआर इथं आणण्यात आलेत. तर निलेश संकपाळ हा गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी सीपीआर इथं दाखल करण्यात आलंय. दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच कदमवाडी, भोसलेवाडी परीसरातील तरुण सीपीआर परिसरात मोठ्या संख्येनं जमा झालेत.
Tags
कोल्हापूर