प्रेस मीडिया लाईव्ह :
श्री बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ अंबप संचलित कॉलेज ऑफ एज्युकेशन (बी.एड.) पेठवडगाव मधील अंतरवासिता ग्रुप क्रमांक १ ची जे.के. माळवे प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा पेठ वडगाव येथे आंतरवासिता कार्यक्रम दिनांक 19 डिसेंबर 2022 ते 19 फेब्रुवारी 2023 पर्यंत सुरू आहे या आंतरवासितेचा सांगता समारंभ घेण्यात आला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून काॅलेज ऑफ एज्युकेशन बी.एड. पेठ वडगाव च्या प्राचार्या निर्मळे आर.एल.व अध्यक्ष श्री सी.जी. पाटील सर होते. तसेच मार्गदर्शिका प्रा. शिरतोडे व्ही.एल., संपर्क शिक्षिका पाटील मॅडम, छात्रमुख्याध्यापिका वृषाली मुंडे, छात्रउपमुख्याध्यापिका शुभांगी पाटील, पर्यवेक्षिका सुप्रिया माने, इतर सर्व छात्राध्यापक व जे.के. माळवे शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी या कार्यक्रमास उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधुरी सुतार व मीनाक्षी चौगुले तसेच प्रास्ताविक विनायक पाटील पाहुण्यांची ओळख व स्वागत सुप्रिया माने मनोगत सुजाता कुंभार, वृषाली मुंडे, शुभांगी पाटील यांनी केले. आभार रवीना पाटील यांनी मांडले. मान्यवरांच्या मध्ये मार्गदर्शिका शिरतोडे मॅडम, वाळंबे सर, पाटील मॅडम, निर्मळे मॅडम व सी.जी. पाटील सर यांनी अध्यक्षीय भाषण केले.निर्मळे मॅडम यांनी मुलांना भविष्यात काय करावे व कसे वागावे याविषयी मार्गदर्शन केले
.सी.जी पाटील सर व पाटील मॅडम यांनी दोन महिन्याच्या कालावधीमध्ये छात्राध्यापकांनी केलेल्या विविध आणि विशेष कार्यक्रमांची व कार्यवाहीची माहिती दिली व सर्व छात्राध्यापकांचे कौतुक केले. तसेच छात्राध्यापकांना प्लेसमेंटचीही ऑफर दिली.काही विद्यार्थ्यांनी छात्राध्यापकांच्या बद्दल मनोगत व्यक्त केली. छात्राध्यापकांनी तेथील विद्यार्थ्यांसाठी कार्यक्रमांमध्ये गुणांकनप्राप्त विद्यार्थ्यांना दिलेल्या बक्षीसां बरोबरच इतर सर्वच विद्यार्थ्यांना आवश्यक साहित्याचे वाटप केले व शाळेसाठीही उपयोगी भेटवस्तू दिली. याप्रमाणे आंतरवासितेचा सांगता समारंभ संपन्न झाला .