श्री बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ अंबप ,संचलित कॉलेज ऑफ एज्युकेशन (बीएड्.) पेठवडगाव येथील बी.एड्. द्वितीय वर्षातील सेमिस्टर तीन मधील शालेय आंतरवासिता प्रात्यक्षिकांतर्गत "सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय कसबा तारळे" येथे शालेय आंतरवासिता सांगता समारंभ संपन्न झाला.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे प्र.प्राचार्या सौ निर्मळे आर. एल. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री.हुजरे पी.जी.सर तसेच प्रमुख उपस्थितीमध्ये गट मार्गदर्शक सोरटे एस.के सर, प्राध्यापिका शिरतोडे मॅडम , प्राध्यापिका सावंत मॅडम ,प्राध्यापिका चरणकर मॅडम उपस्थित होते. तसेच इतर उपस्थित सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय शाळेतील मुख्याध्यापक श्री. वागरे डी. डी.सर श्री.जे.एस.चरापले सर , सौ . एस. आर.चौगुले मॅडम,श्री.एस.एस. आरडे सर व आंतरवासिता गटातील सर्व छात्राध्यापक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक छात्रअध्यापक एकनाथ राउत सर यांनी केले व पाहुण्यांचा परिचय छात्राध्यापक रवी भुगुलकर यांनी केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन बजंत्री सर यांनी केले. आंतरवासिता कार्यक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. शाळेतील विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्याचप्रमाणे प्रमुख पाहुणे , अध्यक्ष व प्रमुख उपस्थिती यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. आंतरवासितेमधील अभिरूप छात्र मुख्याध्यापक राज बारड यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय या शाळेतील शिक्षकांनी सर्व छात्र आध्यापकांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या शेवटी छात्राध्यापक संदीप हूल्ले यांनी आभार मानले. विष्णू डवर, जगदीश साठे, विशाल सिंह कांबळे या छत्राध्यापकानी कार्यक्रमाचे नियोजन केले अशाप्रकारे 15 डिसेंबर पासून चालू असलेल्या शालेय आंतरवासिता प्रात्यक्षिकाची प्राचार्यांच्या संमतीने सांगता झाली.