प्रेस मीडिया लाईव्ह :
श्री बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ अंबप संचलित, "कॉलेज ऑफ एज्युकेशन "(बी.एड्.) पेठ वडगाव शैक्षणिक वर्ष 2022-23 मधील "शाळा व नाविन्यपूर्ण अध्ययन -अध्यापन केंद्रांना भेटी " या बी.एड.प्रथम वर्षातील प्रथम सत्रातील प्रात्यक्षिकांतर्गत माननीय प्राचार्या सौ.आर.एल. निर्मळे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली "डॉ सायरस पूनावाला इंटरनॅशनल स्कूल, पेठ वडगाव " या ठिकाणी भेट देण्यात आली.
त्यामध्ये सायन्स लॅब, केमिस्ट्री, फिजिक्स,बायोलाॅजी,भाषा प्रयोगशाळा,आर्ट ॲन्ड क्राफ्ट रूम इत्यादी विषयी माहिती घेतली.सर्व भौतिक सुविधा व डिजिटल क्लासरूम व अध्ययन अध्यापनाची अद्ययावत साधने यांची ओळख करून घेतली.११वी १२वी साठी विशेष सैनिकी प्रशिक्षण व्यवस्था, क्लासरुम पाहण्यात आली.विध्यार्थ्यांसाठी प्ले ग्राऊंड,बाग व विविध खेळांच्या सहित्यांची माहिती दिली.लायब्ररी, कंम्प्युटर लॅब, कार्यालयीन कामकाज याचीही माहिती घेतली.तेथिल विशेष व आदर्श शिक्षक यांच्या मुलाखती घेतल्या . या प्रात्यक्षिकासाठी शाळेतील रोहित सर,राजकुंवर मॅम, विद्याधर सर, प्रिन्सिपल जाधव सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.शाळेची जेवण व्यवस्था,मेस कामकाज पाहण्यात आले.तेथील समुपदेशक डॉ.माधवी मॅम यांनीही सर्व छात्राध्यापकांना सुयोग्य मार्गदर्शन केले.या प्रात्यक्षिकासाठी प्रा. शिरतोडे व्ही.एल. यांचे मार्गदर्शन लाभले.तसेच प्रा.सोरटे, सावंत,चरणकर यांचेही मार्गदर्शन लाभले. या भेटीस प्राध्यापिका शिरतोडे मॅडम, प्रा. सोरटे सर, प्राध्यापिका सावंत मॅडम, प्राध्यापिका चरणकर मॅडम व बी.एड्.प्रथम वर्षातील छात्राध्यापक व छात्राध्यापिका उपस्थित होते..