इचलकरंजी महानगरपालिका क्षेत्रातील वैद्यकीय व्यावसायिका साठी

  गर्भधारणा पूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्र ( लिंग निवडिस प्रतिबंध) पी. सी. पी. एन. डी. टी. अधिनियम अंतर्गत सल्लागार समिती नियुक्त



प्रेस मीडिया लाईव्ह :

कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी : श्रीकांत कांबळे

 इचलकरंजी महानगरपालिका क्षेत्रातील वैद्यकीय व्यावसायिका साठी गर्भधारणा पूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्र (लिंग निवडीस प्रतिबंध) पी. सी. पी. एन. डी. टी. अधिनियम अंतर्गत सल्लागार समिती  गठीत करणे आवश्यक असल्याने इचलकरंजी महानगरपालिका स्तरावर इचलकरंजी महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक सुधाकर देशमुख यांचे आदेशानुसार आज दिनांक २२ फेब्रुवारी रोजी समिती नियुक्त करणेत  आली.

    सदर अधिनियमाच्या सूचनेनुसार या समितीमध्ये एक स्त्रीरोग तज्ञ, एक प्रसूतीशास्त्र तज्ञ, एक बालरोग तज्ञ, एक कायदा तज्ञ, माहिती व प्रसिद्धी विभागाशी संबंधित महानगरपालिका अधिकारी, तसेच शहरातील तीन प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते (यापैकी एक महिला प्रतिनिधी) यांचा समावेश करणे गरजेचे आहे.

या अनुषंगाने शहरातील प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉ.अमरेश्वर कुलकर्णी, डॉ.प्रसाद कुलकर्णी, बालरोग तज्ञ डॉ. दशावतार बडे, सामाजिक कार्यकर्त्या शशिकला बोरा, सामाजिक कार्यकर्त्या स्नेहा मराठे, सामाजिक कार्यकर्ते संजय खुळ,  (कायदा तज्ञ) म्हणून विधी अधिकारी इचलकरंजी महानगरपालिका खादीजा सनदी, माहिती व जनसंपर्क अधिकारी इचलकरंजी महानगरपालिका नितिन बनगे यांचा समावेश करणेत आलेला आहे. त्याचबरोबर प्रसिद्ध रेडिओलॉजिस्ट डॉ. प्रसाद रानडे यांचा निमंत्रित सदस्य म्हणून समावेश करण्यात आलेला आहे.

      तसेच सदर समितीचे सदस्य सचिव म्हणून महानगर पालिका वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ सुनिलदत्त संगेवार यांची नियुक्ती करण्यात आलेली असून  आजच्या पहिल्या बैठकीत समितीचे अध्यक्ष म्हणून डॉ.अमरेश्वर कुलकर्णी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी उपस्थित सर्व नूतन समिती सदस्यांचा आयुक्त तथा प्रशासक सुधाकर देशमुख यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार करुन सदर कायद्याची इचलकरंजी शहरात काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याच्या सक्त सूचना समिती सदस्यांना दिल्या.

    सदर समितीमार्फत इचलकरंजी महानगरपालिका हद्दीतील गर्भधारणा पूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्र लिंग निवडीस प्रतिबंध, मुंबई नर्सिंग होम १९४९ अॅक्ट गर्भपात कायदा, कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया इत्यादी बाबतचे कामकाज करून इचलकरंजी शहरात मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी सदर समितीमार्फत विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत.

तसेच सदर कायद्याचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आलेस शहरातील नागरिकांनी महानगरपालिकेचा टोलफ्री       क्रमांक १८००२३३१२१७  वर संपर्क साधावा असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

महानगरपालिकेच्या  आरोग्य विभागाकडे मुंबई नर्सिंग होम १९४९ अॅक्ट अंतर्गत सर्व कामकाज पूर्णवेळ करणेकरिता संभाजी पोवार व महेश पांडव यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post