प्रेस मीडिया लाईव्ह
कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी : श्रीकांत कांबळे
इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने आद्य क्रांतिकारक लहुजी वस्ताद साळवे यांच्या पुण्यतिथी निमित्त महानगरपालिका सभागृहा मध्ये त्यांच्या प्रतिमेस इचलकरंजी महानगरपालिका प्रभारी अधिकारी तथा प्रशासक सुधाकर देशमुख यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करणेत आले.
याप्रसंगी प्रभारी उपायुक्त केतन गुजर , संगणक अभियंता संतोष पवार, वाहन अधिक्षक राजेंद्र मिरगे, खरेदी पर्यवेक्षक शितल पाटील, मिळकत पर्यवेक्षक सचिन पाटील, जनसंपर्क अधिकारी नितिन बनगे, सुरक्षा रक्षक पर्यवेक्षक उमाजी कणसे, मारुती जाधव, सचिन शेडबाळे आदी उपस्थित होते.
Tags
कोल्हापूर जिल्हा