प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - घरफोडी करणाऱ्या तीन आरोपींना पकडून त्यांच्याकडून कोल्हापूर शहर व परिसरातील एकूण 14 घरफोडी चोरीचे गुन्हें उघडकीस आणले आहेत , तसेच त्यांच्याकडून 24,32,646/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे . सदरची कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने केली आहे. या बाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, मोरेवाडीतील नंदनवन कॉलनीतील निखिलेश राजाराम सासमिले यांचा बंद बंगला लक्ष्य करत चोरट्यानी 6 नोव्हेंबर 2022 सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम लंपास केली होती.याबाबत करवीर पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याच्या तपासा दरम्यान राजू सल्वराज तंगराज (रा. कारगल, ता. सागरा, जि. शिमोगा) यानं त्याच्या साथीदारां सोबत सासमिले यांच्या बंगल्या सह कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी घरफोडी केल्याची माहिती समोर आली होती.गुन्हे केल्याची गोपनीय माहिती या माहितीच्या आधारे पोलीसांनी सापळा रचून राजू सल्वराज तंगराज आणि भिमगोंडा मारुती पाटील (वय 29,रा. हलकर्णी, ता.गडहिंग्लज) या दोघांना ताब्यात घेतलं . त्यांनी करवीर, गांधीनगर, गोकुळ शिरगाव या पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण 13 घरफोडी केल्याची कबुली दिलीय . त्यांच्याकडून सोन्या चांदीच्या दागिन्यासह सुमारे एकोणीस लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.