प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर : सोन्याचे दागिने पॉलिश करण्याच्या बहाण्याने शहरासह ग्रामीण भागातील महिलांची फसवणूक करणाऱ्या टोळीतील सहा जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. सचिन कुमार शाह, बुवा राजू बढई, कुंदन कुमार शाह, धीरज कुमार शाह, भावेश गुप्ता, आयर्न गुप्ता असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या टोळीकडून स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने १३ लाख ५० हजार रुपये किमतीचे दागिने हस्तगत केले आहेत.
याबाबत अधिकची माहिती अशी की, सोन्याचे दागिने पॉलिश करण्याच्या बहाण्याने पोलिसांची फसवणूक करणाऱ्या परप्रांतीय टोळीने कोल्हापुरात धुमाकुळ घातला होता. पोलिसांनी या टोळीमधील सहा जणांना ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींनी कोल्हापुरातील पाच गुन्ह्यांची कबुली दिली आहे. या गँगने सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, पुणे, मराठावाडा, विदर्भ आणि कोकण व गोव्यातही फसवणुकीचे गुन्हे केले असावे, असा संशय पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी व्यक्त केला आहे.