प्रेस मीडिया लाईव्ह :
कोकरुड/वार्ताहर
नव उद्योजकांनी व्यवसाय करताना हिंम्मत सोडू नये असे प्रतिपादन कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले यांनी केले.ते कोकरूड तालुका शिराळा येथे भारतीय उद्यमिता विकास संस्थान, अहमदाबाद(EDII),टाटा कम्युनिकेशन व कोलॅबोरेशन सव्हिर्सेस यांच्या वतीने , आणि सुभिक्षा फौंडेशनच्या संयोजनाने आयोजित केलेल्या उद्योजकता विकास कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी नेताजी प्रबोधिनीचे संस्थापक प्रा.अनिल फाळके होते.
यावेळी भारतीय उद्यमिता विकास संस्थेचे सहाय्यक प्राध्यापक प्रकाश सोळंकी, जिल्हा उद्योग केंद्राचे जनरल मॅनेजर संतोष गवळी, ईडीआयच्या बोर्ड मेंबर राजेश्री आनंद पाटील, जि.प.सदस्य संपतराव देशमुख, सरपंच अनिता देशमुख, प्रशिक्षक सागर धुमाळ,यशस्वी उद्योजक बळीराम पाटील, सौ. मनिषा कुरळपकर, यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी बोलताना जिल्हाधिकारी राहुल रेखावार पुढे म्हणाले की, आपण कोणताही उद्योग व्यवसाय सुरू करण्यापूर्वी तश्या स्वरुपातील सुरू असणाऱ्या उद्योगांमध्ये न संकोच बाळगता काम करुन, माहिती घेतली पाहिजे.उद्योग व्यवसाय करताना अपयश आले तरी थांबायचे नाही. ते वैयक्तिक चॅंलेज म्हणून स्वीकारले पाहिजे. उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्र व शासनाचे विविध महामंडळाच्या माध्यमातून भांडवलासाठी कर्जपुरवठा केला जातो, याचाही लाभ घेतला पाहिजे.नव उद्योजकांनी सुरवातीला छोटे - मोठे उद्योग सुरू करुन यातून मार्गक्रमण करून छोट्या चा मोठा उद्योग कसा करता येईल हे बघितले पाहिजे.आपल्याच जिल्ह्यातील अनेक महिला व युवकांनी उद्योग व्यवसाय सुरू करुन ते दोन वर्ष,तीन वर्षांत यशस्वी झाले.तर आपण का होणार नाही. आपणही यशस्वी होवू शकतो हा आत्मविश्वास निर्माण झाला पाहिजे. ईडीआयचे सहाय्यक प्राध्यापक प्रकाश सोळंकी म्हणाले की, ईडीआय ही राष्ट्रीय पातळीवरती काम करणारी संस्था आहे अलीकडेच या संस्थेने भारताबाहेर 27 देशात आपल्या कार्याचा कार्यविस्तार वाढवला आहे. कोकरूड सारख्या ग्रामीण भागात या संस्थेचा उद्योजकता विकास कार्यक्रम बोर्ड मेंबर राजेश्री पाटील यांच्या प्रयत्नातून झाला.
या कार्यशाळेमध्ये गेले २१ दिवस विविध विविध प्रशिक्षकांनी उद्योग उभारणीसाठी पायाभूत गरजांपासुन ते उद्योग नोंदणी पर्यंतचे सखोल मार्गदर्शन केले गेले. तसेच या कार्यशाळेमध्ये विविध साबण, वाॅशिंग पावडर, उदबत्ती, जाम, साॅस व जेली आदी पदार्थ बनवणेचे प्रशिक्षण देणेत आले. प्रशिक्षणाला येथील युवक युवती गृहिणी यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन हे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले. ही गौरवाची बाब आहे.
या प्रसंगी, उद्योजक बळीराम पाटील, सौ. मनिषा कुरळपकर, संपतराव देशमुख, प्रशिक्षणार्थी सतिश नांगरे, डॉ.निलम ठोंबरे आदींनी मनोगत व्यक्त केली.या कार्यक्रमास प्राचार्या डॉ.उज्वला पाटील, धन्वंतरी हाॅस्पिटलचे डॉ.एस.एन.पाटील, शिवतेज पतसंस्थेचे संस्थापक अनिलराव देशमुख, रेठरे वारणाच्या सरपंच वंदना ठोंबरे, उषाताई पाटील,
डॉ.प्रज्ञा पाटील,संजय पाटील, सदाशिव पाटील, सुनिल पाटील माजी सरपंच श्रीरंग नांगरे,कोकरुडचे उपसरपंच अंकुश नांगरे, पोपट पाटील, नंदकुमार पाटील, मोहन पाटील,ग्रा.प.सदस्य सूरेश घोडे,भरत नांगरे, सचिन घोडे ,तोसीफ मकानदार, बाजीराव घोडे आदींसह प्रशिक्षणार्थी , कोकरुड पंचक्रोशीतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थीत होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आनंदा पाटील,स्वागत डॉ.पंकज पाटील यांनी प्रास्ताविक संस्थेच्या बोर्ड मेंबर राजेश्री पाटील तर आभार प्रा.ए.सी.पाटील यांनी मानले. या कार्यक्रमाचे नेटके संयोजन सुभिक्षा फौंडेशनच्या वतीने करण्यात आले होते.
फोटो ओळी: उद्योजकता विकास कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी राहुल रेखावार, व्यासपीठावर प्रकाश सोळंकी, प्रा.अनिल फाळके, राजेश्री पाटील,संपतराव देशमुख, अनिता देशमुख, उद्योजक बळीराम पाटील अण्य (छाया शबनम फोटो)