नवी मुंबई : उरणच्या चिट फंड घोटाळ्यातील आरोपीला अटक; १० कोटींची रोख रक्कम जप्त

 



प्रेस मीडिया लाईव्ह 

विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील

गुंतविलेल्या पैशांवर ४० टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या सतीश गावंडला उरण पोलिसांनी एका महिलेच्या तक्रारीवरून शुक्रवारी रात्री अटक केली आहे. त्याच्या कडून पोलिसांनी दहा कोटींची रोख रक्कम जप्त केली आहे. त्याला उरण न्यायालयाने शुक्रवार (२३ फेब्रुवारी) पर्यंतची पोलीस कोठडी दिली आहे. याची माहिती देण्यासाठी नवी मुंबईच्या परिमंडळ २ चे उपायुक्त यांनी पनवेल येथे पत्रकार परिषद घेऊन दिली.

त्याला उरण न्यायालयाने शुक्रवार(२३ फेब्रुवारी) पर्यंतची पोलीस कोठडी दिली आहे. याची माहिती देण्यासाठी नवी मुंबईच्या परिमंडळ २ चे उपायुक्त यांनी पनवेल येथे पत्रकार परिषद घेऊन दिली.

दोन वर्षांपासून उरण तालुक्यात पैसे दुप्पट करून देण्याचे आमिष दाखविणाऱ्या पिरकोन येथील ३२ वर्षीय सतीश गावंड याला उरण पोलीसांनी शुक्रवारी रात्री अटक केली आहे. यावेळी, त्याच्याकडे सुमारे दहा कोटी रुपयांची रोकड आढळून आली आहे. सतीश गावंड याने पैसे हे पन्नास टक्के अधिक करणे, वस्तू कमी किमतीत देण्याची मोहीम सुरू केली होती. यामध्ये, गेल्या सुमारे दीड ते दोन वर्षांपासून सुरू असलेल्या मोहिमेत अनेक रहिवाशांनी पैसे गुंतवले होते. यावेळी, ३२ हजार रुपयांच्या मोबदल्यात ४० ते ५० दिवसात सुमारे ५० टक्क्यांपेक्षा अधिक व्याज देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत होते.

दरम्यान, यासंदर्भात उरण पोलीसांना माहिती मिळताच नवीमुंबई पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या १५ दिवसांपासून सापळा लावण्यात आला होता. शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास उरणचे सह पोलीस आयुक्त धनाजी क्षिरसागर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांना मिळालेल्या माहितीवरून खोपटे करंजा मार्गावरील कारमधून सतीश गावंड याला अटक करण्यात आली आहे. यावेळी, संशयित इको गाडीची तपासणी केली असता सतीश याच्यासमवेत कोट्यवधी रुपयांची रोख रक्कम आढळून आली.

इको गाडीतील मधल्या सीटच्या जागेमध्ये दहा बॅगांमध्ये कोट्यवधी रुपये आढळून आल्याने गाडीचालकाला देखील ताब्यात घेण्यात आले आहे. तर, रात्री सुमारे पाच तासांपेक्षा अधिक काळ सुरू असलेल्या रकमेच्या मोजणीमध्ये ही रक्कम सुमारे दहा कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. यावेळी, आरोपी सतीश याच्या समक्ष ही संपूर्ण रक्कम मोजण्यात आली अडसल्याचे सांगण्यात आले आहे. तर, या प्रकरणी कलम ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१ आणि चिट फंड ऍक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे सह आयुक्त धनाजी क्षिरसागर यांनी दिली.

गावंड याच्याकडे आढळून आलेल्या या रकमेनंतर पोलीसांचे चार पथक तयार करण्यात आले असून त्याच्या घराची देखील झडती घेण्यात आली आहे. तर, सतीश याच्या बँकेच्या खात्यामध्ये देखील सुमारे दहा कोटी रुपये असल्याची माहिती मिळाली असल्याचे सूत्रांनी सांगितले असून त्याच्यासोबत असलेल्या सहकाऱ्यांची देखील चौकशी करण्यात येणार असल्याची शक्यता आहे.

दरम्यान, या सगळ्या प्रकरणी आयकर विभाग आणि सायबर सेलमार्फत देखील चौकशी करण्यात येणार आहे. तसेच, उरण परिसरात अशा पद्धतीचे दाम दुपट्ट करणाऱ्या व्यक्तींचा देखील शोध घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post