प्रेस मीडिया लाईव्ह :
राहुल सोनोने : (मळसुर)
पातूर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या समर्थ नगर येथील संजय सोनोने यांच्या घरामध्ये दोन महिन्यात दोन वेळा घर फोडून चोरी करण्याचा प्रयत्न २३ फेब्रुवारी २२ रोजी सकाळी उघडकीस आली आहे.
संजय सोनोने यांनी पातूर पोलीस स्टेशन येथे दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या घरी ३१ डिसेंबर २०२२ व २३ फेब्रुवारी ला अज्ञात व्यक्तीकडून घराचे कुलूप तोडून साहित्य फेकफाक केले आहे. या घटनेबाबत आपणाकडून कसून चौकशी करून चोरट्याचा शोध घेण्यात यावी अशी मागणी पातूर पोलीस स्टेशनला लेखी तक्रारी केली आहे.दोन्ही वेळ तक्रारी करून सुद्धा पातूर पोलीस याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप या परिसरातील ग्रामस्थाकडून होत आहे. या समर्थ नगरात गस्ती वरील पथकाच्या उपस्थितीत क्यू आर कोड हा मध्य वस्तीत असून माझ्या घराजवळ लावून गस्त घालत असलेले पथक तिथं पर्यत पोहचू शकतील.तसेच घरातली कुलुप, आलमारी,कपाट मधील सामानाची अस्ताव्यस्त झाली असल्याचे जबानी रिपोर्ट मध्ये लेकी तक्रार दिली आहे.