पत्रकार शशिकांत वारिसे यांचा हा अपघात नसून घातपात ..रिफायनरी विरोधी संघटना.



प्रेस मीडिया लाईव्ह :

रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील महानगरी टाईम्सच्या वृत्तपत्राचे निर्भिड पत्रकार शशिकांत वारिसे यांचा उपचारा दरम्यान अपघाती मृत्यू झाला आहे.राजापूर येथील पेट्रोल पंपावर त्यांना थार गाडीनं जोरात धडक दिली होती. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रत्नागिरीहून कोल्हापूर येथे दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा  मृत्यू झाला . 

पत्रकार शशिकांत वारिसे यांचा हा अपघात नसून घातपात असल्याचा आरोप रिफायनरी विरोधी संघटनेने केला आहे. रत्नागिरीतील पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या मृत्यू प्रकरणात आता कार चालक पंढरीनाथ आंबेरकर याला सोमवारी रात्री अटक करण्यात आली. पोलिसांनी आरोपीला कोर्टात हजर  केले असता आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

या प्रकरणात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा आंबेरकर यांच्यावर दाखल करण्यात आला आहे.वारिसे यांच्या निकटवर्तीयांनी मृतदेह ताब्यात न घेता तो राजापूर पोलीस स्टेशनसमोर ठेवण्याची भूमिका घेतली होती. त्यानंतर पोलिसांनी 302 चा गुन्हा पंढरीनाथ आंबेरकर यांच्यावर दाखल केला जाईल असे आश्वासन दिले. यानंतर निकटवर्तीयांनी काहीशी मवाळ भूमिका घेतली. पत्रकार वारिसे यांच्यावरती आज रात्री अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

या प्रकरणात पोलीस आपली भूमिका चोख बजावणार. कोणत्याही दबावाला पोलीस बळी पडणार नसल्याचे रत्नागिरी पोलिसांनी स्पष्ट केले आहे. या प्रकरणाच्या तपासात फॉरेन्सिक रिपोर्ट देखील तपासले जातील. सीसीटीव्हीसह प्रत्येक बाजूंचा विचार पोलीस करणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post