खानापूर - आटपाडी मतदारसंघ राष्ट्रवादीमय करणार ...सादिक खाटीक - सुरज पाटील.




प्रेस मीडिया लाईव्ह : 

आटपाडी :  आमदार जयंतराव पाटील यांच्या पाठीशी, विसापूर सर्कल सह, खानापूर - आटपाडी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस भक्कम पणे उभी राहील यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याचा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशचे महासचिव सादिक खाटीक आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे आटपाडी तालुका अध्यक्ष सुरज पाटील यांनी व्यक्त केला . 

   राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री, आमदार जयंतरावजी पाटील साहेब यांच्या सूचनेनुसार एक तास राष्ट्रवादी साठी" या उपक्रमाच्या माध्यमातून आज आटपाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश महासचिव सादिक खाटीक यांच्या निवासस्थानी गाव / प्रभाग भेट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . राज्यातल्या चौदाव्या आणि आटपाडीतल्या अकराव्या गाव - प्रभाग भेटीच्या बैठकीवेळी  सादिक खाटीक - सुरज पाटील बोलत होते . 

    शेतकरी, कष्टकरी, ज्येष्ट मंडळी, महिला, युवक, युवती, विद्यार्थी, सुशिक्षित, सेवानिवृत्त असे समाजातील सर्व स्तरातील सर्व जाती - जमाती - धर्माचे लोक हे राष्ट्रवादी काँग्रेसचा मजबुत पाया आहेत . या सर्वांना एकसंघ करीत खानापूर आटपाडी तालुके आणि विसापूर सर्कल मधील प्रत्येक बुथ ची मजबूत पक्षीय बांधणी करून या मतदार संघात आमदार जयंतराव पाटील यांच्या पाठीशी मोठी शक्ती उभी करणार आहोत. असे स्पष्ट करून सादिक खाटीक - सुरज पाटील  यांनी, महिला, तरुण, तरुणींना काम मिळावे, शेतकऱ्यांना उद्योग व्यवसायाची साथ लाभावी, यासाठी राजारामबापू उदयोग समुहातील अनेक उद्योग आटपाडी - खानापूरात यावेत, यासाठी आमदार जयंतराव पाटील यांना विनवणार आहोत. असे त्यांनी स्पष्ट केले .

   प्रारंभी, अमीर खाटीक, मुसा शेख यांनी स्वागत केले आणि असिफ (बाबु ) खाटीक यांनी प्रास्तावीक केले . यावेळी उपस्थित केल्या गेलेल्या अनेक प्रश्नांवर व्यापक चर्चा करण्यात आली .   

  यावेळी ज्येष्ट नागरीक आबासाहेब हाके, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका सरचिटणीस नितीन डांगे,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष दिपक पाटील, अनिल जाधव, अमित मोरे, असिफ ( बाबु ) खाटीक, अमीर खाटीक, रियाज शेख, संजय मोटे, इम्रान शेख, इरफान शेख, शब्बीर मुलाणी, चांद पठाण, बाळासाहेब ढगे, रॉमी शेख, समीर खाटीक, जमीर कलाल, शहबाज मुलाणी, जमीर मुलाणी मैनुद्दीन मुलाणी, सौ . मुमताज खाटीक, प्रतिभा कदम, अमृता बनसोडे, सौ . रशिदा महंमद शेख, श्रीमती शाबेरा खाटीक, श्रीमती रशिदा खाटीक, सौ . राबियाँबसरी खाटीक, सौ. शुभांगी जवळे, सौ . गोकुळा हाके, जिज्ञासा गायकवाड, प्रतिक्षा मोटे, प्रज्ञा रुपटक्के, अंकिता येळे, अपशान खाटिक इत्यादी अनेक जण उपस्थित होते . शेवटी रियाज शेख यांनी आभार मानले

Post a Comment

Previous Post Next Post