प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : हिंदू महासंघाच्या फर्ग्युसन कॉलेज शाखेचे उदघाटन सोमवारी हिंदू महासंघ चे अध्यक्ष आनंद दवे आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत झाले .या प्रसंगी ४० जणांची कार्यकारिणी नियुक्त करण्यात आली . साहिल पारकर यांची फर्गसन महाविद्यालय शाखाप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली.
'कॉलेज विश्वातच विद्यार्थी वर्गात जातीय द्वेष निर्माण करण्याच कार्य राजकीय पक्षांकडून होत आहे आणि जाती- जातीत विद्यार्थी विभागल्या गेल्याने हिंदुत्ववादी विचारांची ताकद सुद्धा विभागली जाते आणि हिंदुत्वाचं नुकसान होत आहे. या प्रश्नावर हिंदू महासंघ हेच एकमेव उत्तर आहे,भविष्यात सर्वच कॉलेज मधे महासंघाच्या शाखांचे उदघाटन करण्याचा आमचा प्रयत्न आहे ',असे महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी सांगितले.'विद्यार्थी वर्गाचे प्रश्न सोडवण्यासाठी कॉलेज च्या सहकार्याने आम्ही प्रयत्न करू', असे शाखाप्रमुख साहिल पारकर यांनी सांगितले.
या प्रसंगी आनंद दवे, विवेक परदेशी, मनीषा धारणे, तृप्ती तारे, संकेत मेहंदळे तर फर्गसन महाविद्यालयाचे साहिल पारकर,लखन झुराळे,तेजस तारे,राकेश सावकार,आदिराज बांगर,आनंद अंभोरे,ज्ञानेश्वर पाटील, पुंडलिक मधे, पुष्कर भोयर,प्रेम साबळे,ऋषिकेश गुटे, सिद्देश गिरी,श्रीनिवास कोकरे,अविष गौड, यशोदास पठाडे,अनमोल माळी,कबीर करे,दिंगबर सलगरे उपस्थित होते.