सव्वा सहा लाखांचा ३२ किलो गांजा जप्त केला
प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : जी २० (G20) व प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत अमली पदार्थ विरोधी पथक दोन ने गांजाची तस्करी करणाऱ्या दोघांना सापळा रचून अटक केली आहे. त्यांच्याकडून सव्वा सहा लाखांचा ३२ किलो गांजा जप्त केला आहे.अक्षय अशोक रोकडे (वय २१ रा. करमाळा, जि.सोलापूर) आणि करण विलास सुरवसे (वय १९ रा. पारगाव खंडाळा, जि. सातारा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
या प्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, सहाय्यक आयुक्त नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक सुनिल थोपटे व त्यांच्या पथकाने केली आहे. पुणे पोलिसांकडून कायदा सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी तसेच जी २० आणि प्रजासत्ताक दिनानिमित्त मध्यरात्री विशेष मोहिम राबविण्यात आली. यादरम्यान, गुन्हेगारांचे चेकिंग केले जात होते. तर, पाहिजे आरोपी व फरार आरोपींची माहिती घेतली जात असताना अमली पदार्थ विरोधी पथकाला समर्थ परिसरात दोघेजन गांजाची तस्करी करण्यासाठी आल्याची माहिती मिळाली. त्यानूसार, पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, सहाय्यक आयुक्त नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक सुनिल थोपटे आणि त्यांच्या पथकाने या दोघांना सापळा लावून पकडले. त्यांच्याकडे साडे सहा लाखांचा ३२ किलो गांजा मिळाला. त्यांनी हा गांजा कोणाकडून आणला आहे. तसेच, तो कोणाला विकणार होते, याबाबत पोलीस तपास करत आहेत.