प्रेस मीडिया लाईव्ह :
सांगली (प्रतिनिधी : - इंडियन ह्युमन राईटस कौंसिलच्या सांगली जिल्हा महिला अध्यक्षापदी- डॉ. सौ. राजमा इसाक नदाफ , उपाध्यक्षापदी- सौ. माधुरी सचिन आरवाळे , सचिव पदी- सौ. अनिता सचिन शेंडगे यांची तर स्पोकन पर्सनपदी- सौ. अर्चना राजेंद्र पाटील यांची निवड झाली आहे. सांगली जिल्हा अध्यक्षपदी- श्री प्रशांत जगन्नाथ ताम्हणकर यांची निवड करण्यात आली आहे.
यावेळी आयोजित अवेअरनेस प्रोग्राम आणि ग्रुप मिटिंगच्या अध्यक्षा- डॉ. मयुरी बुरले, मॅडम व ह्युमन राईट्सच्या कोल्हापूर जिल्हा महिला अध्यक्षा- सौ. शोभा वसवाडे, मॅडम यांच्या हस्ते सर्वांना निवडपत्र व ओळखपत्र देण्यात आले. यावेळी ह्युमन राईट्सचे राज्य सचिव मा. सलिम मुल्ला यांनी ह्युमन राईट्सच्या कामकाजा विषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
याप्रसंगी उपस्थित मान्यवरांचा पुष्पगुच्छ देवून सन्मान करण्यात आला. सदरचा कार्यक्रम "संस्कृती मल्टीस्पेशालिटी हाॕस्पिटल, सांगली येथे नुकताच पार पडला.
यावेळी ह्युमन राईट्सचे राज्य सल्लागार मा. अस्लम सनदी; राज्य संपर्क प्रमुख मा. शौकत माणगावे; शिवाजी येडवान, माणकापूर; रफीक नदाफ, जयसिंगपूर; मा. रजिया मुजावर,इचलकरंजी आदी प्रमुख मान्यवरांसह ह्युमन राईट्सचे कार्यकर्ते आणि महिला कार्यकर्त्या उपस्थित होते. यावेळी स्वागत व प्रास्ताविक अध्यक्षा डॉ. राजमा नदाफ यांनी केले तर उपस्थितांचे आभार उपाध्यक्षा सौ. माधुरी आरवाळे यांनी मानले.