दे आसरा फाउंडेशनचा उद्योजक मेळावा
प्रेस मीडिया लाईव्ह :
दे आसरा फाउंडेशन, पुणे आणि वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय, सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने सांगली मध्ये उद्योजक मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. छोट्या उद्योजकांना व्यवसाय करताना मदत व्हावी यासाठी या मेळाव्यात तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केलं जाणार आहे. व्यवसायातल्या यशाचा मंत्र आणि तंत्रजाणून घेण्यासाठी या मेळाव्यात सर्व उद्योजकांनी सहभागी व्हावं असं आवाहन दे आसरा फाउंडेशनच्या वतीने करण्यात आलं आहे. या कार्यक्रमासाठी कुठलेही शुल्क आकारण्यात आलेले नसून सर्वांसाठी खुला आहे.
कार्यक्रम दिनांक ३१ जानेवारी २०२३, वेळ - दु. ३:३० ते सायं. ५:३०, स्थळ:- टिळक सभागृह, वालचंद कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, सांगली-मिरज रोड, विश्रामबाग, सांगली ४१६४१५ दे आसरा फाउंडेशनने आत्तापर्यंत १ लाख ७० हजारांपेक्षा जास्त उद्योजकांना मदत केली आहे.
संपर्कासाठी ७७२००२८४०६
-