प्रेस मीडिया लाईव्ह :
सांगली : ग्रामीण भागातील युवकांनी उद्योग व्यवसायाकडे वळावे असे प्रतिपादन राज्यपाल तामिळनाडू यांचे प्रधान सचिव आनंद पाटील यांनी केले. ते कोकरुड (ता.शिराळा)येथे भारतीय उद्यमिता विकास संस्थान, अहमदाबाद, टाटा कम्युनिकेशन व टाटा कम्युनिकेशन कोलॅबोरेशन सव्हिर्सेस यांच्या वतीने आयोजित केलेल्या उद्योजकता विकास कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.
या प्रसंगी भारतीय उद्यमिता विकास संस्थेच्या बोर्ड मेंबर राजेश्री पाटील, जिल्हा उद्योग केंद्राचे जनरल मॅनेजर संतोष गवळी,बॅंक ऑफ महाराष्ट्र, कोल्हापूर विभागाच्या मुख्य प्रबंधक सोनाली हिवरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
पाटील म्हणाले की,आज स्पर्धेच्या युगात नवनवीन आव्हाने आपल्या समोर येत आहेत. या स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी ग्रामीण भागातील युवकांनी नवनवीन उद्योग व्यवसाय सुरू केले पाहिजेत. यासाठी भारतीय उद्यमिता विकास संस्था आपणास सहकार्य करेल. यासाठी तरुण, तरुणींनी चांगला व्यवसायाची निवड करुन व्यवसायातील संधी शोधावी.
या कार्यशाळेचे आयोजन राजेश्री पाटील, बोर्ड मेंबर, भारतीय उद्यमिता विकास संस्था यांच्या संकल्पनेतून करण्यात आले होते, या उद्घाटन सोहळ्यास सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सत्यजित देशमुख यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमास भारतीय उद्यमिता विकास संस्थेचे सहाय्यक प्राध्यापक प्रकाश सोळंकी, नेताजी ॲकॅडमीचे प्रा.आनिल फाळके, प्राचार्या डॉ.उज्वला पाटील, धन्वंतरी हाॅस्पिटलचे डॉ.एस.एन.पाटील,गजानन पाटील, रेठरे वारणाच्या सरपंच वंदना ठोंबरे, ग्रामीण कथाकार बाबासाहेब परीट आदींसह कोकरुड परिसरातील युवक, युवती मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
सूत्रसंचालन आनंदा पाटील (वीरवाडी) यांनी केले. स्वागत डाॅ. पंकज पाटील यांनी केले. प्रास्ताविक राजेश्री पाटील यांनी केले तर आभार ए. सी. पाटील यांनी मानले. कार्यक्रमाचे आयोजन धनश्री मेडिकलचे सदाशिव पाटील, संजय पाटील (आबा) व डाॅ. पंकज पाटील यांनी केले होते.