नवीन पनवेलच्या नागरिकांना वेठीस धरणाऱ्या उडाण पुलाचे प्रत्यक्ष काम झाले सुरू

 मा.विरोधी पक्ष नेते प्रितम म्हात्रे यांनी केली कामाची पाहणी

प्रेस मीडिया लाईव्ह 

विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील

नवीन पनवेल माथेरान रोडला जोडणाऱ्या जीर्ण झालेल्या उडाण पुलामुळे वाहतूक कोंडी होत होती. पुलावर पडलेल्या खड्ड्यांमुळे अनेक अपघात होऊन वाहन चालक जखमी झाले होते. मुखत्वे करून रिक्षा आणि दुचाकीस्वारांना याचा खूप त्रास होत होता.यामुळे नवीन पनवेलचे नागरिक त्रस्त झाले होते. वाहतूक विभागाची परवानगी मिळाल्यानंतर सिडकोच्या माध्यमातून कामाला सुरुवात करण्यात आली. दिनांक २० जानेवारी रोजी रात्री ९ वाजेच्या दरम्यान पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते प्रितम जनार्दन म्हात्रे यांच्या देखरेखीखाली प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे. 



  याचप्रमाणे  M.S.R.D.C. अंतर्गत ठाणा नाका ते खांदा कॉलनी येथे जाताना  रेल्वे उड्डाण पुलाच्या  दुरुस्तीसाठी  संबंधित विभागासोबत पनवेल महानगरपालिकेचे मा. विरोधी पक्षनेते श्री.प्रितम म्हात्रे यांनी पाठपुरवठा केला होता. सदरच्या ठिकाणची परिस्थिती M.S.R.D.C अधिकाऱ्यांच्या नजरेस आणून त्या अनुषंगाने सदर पूलाचे मेंटेनन्स चे काम सुरू करण्याची मागणी केली होती. गेली कित्येक वर्षे रखडलेले काम प्रीतम म्हात्रे यांच्या पाठपुरावामुळे  सुरू झाले आहे. यासाठी संबंधित पुल हा वाहतुकीसाठी एक मार्गिका बंद करण्यात येणार आहे. अशा वेळी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळविणे संदर्भात  वाहतूक शाखेच्या माध्यमातून नियोजन करण्यात आले आहे. प्रवासादरम्यान वाहन चालकांची आणि नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एन विश्वकार यांच्यासोबत पर्यायी रस्त्या संदर्भाची प्रत्यक्ष ठिकाणी भेट देऊन त्यांनी पाहणी केली होती. तसेच नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी आवश्यक ते पूर्ण सहकार्य करू असे सांगितले. वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी ठिकठिकाणी बोर्ड लावणे आणि इतर आवश्यकत्या सूचना केल्या. नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन श्री.प्रितम म्हात्रे यांनी केले आहे. 

          मा.नगरसेविका सौ.प्रीती जॉर्ज, डॉ. सुरेखा मोहोकर, सौ.सारिका भगत यांच्या समवेत  मा. नगरसेवक राजेश हातमोडे, अनिल घरत, दीपक कुदळे, शिवराज साखरे, संदेश डिगोरकर, चिंतामणी गणेश मंडळाचे आश्विन डीचोलकर आणि सदस्य, नवीन पनवेलचे नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी नागरिकांनी प्रितम म्हात्रे आणि उपस्थित पदाधिकाऱ्यांचे  आभार मानत स्वागत केले.

Post a Comment

Previous Post Next Post