प्रेस मीडिया लाईव्ह
विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील
सध्याच्या परिस्थितीत बेरोजगारीचा प्रश्र प्रचंड प्रमाणात भेडसावत आहे . पालक लाखो रुपये खर्च करून मुलांना शिकवतात , मुलसुद्धा खूप परिश्रम करून शिक्षा पूर्ण करतात. परंतु शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सुद्धा नोकरी न मिळाल्यामुळे पालक व बेरोजगार तरुण प्रचंड मानसिक तणावाखाली असतात. त्या परिस्थितीचा विचार करून मनसे जिल्हा उपाध्यक्ष मा. श्री दिपक कांबळी यांच्या माध्यमातून आता पर्यंत अनेक तरुण तरुणींना रोजगार उपलब्ध करून दिला आहे.
त्यांचाच माध्यमातून सुशिक्षित तरुण-तरुणींन करता मोहोपाडा येथील साई मंदिर मध्ये रविवार दि. २९/०१/२०२३ रोजी सकाळी १० ते दुपारी ४ पर्यंत भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करून रोजगाराची संधी उपलब्ध करून देत आहेत.
या रोजगार मेळाव्यामध्ये किमान शिक्षण पाचवी,दहावी , बारावी, पदवी,पदविका , (एम. बी .ए),(इ .टी .इ ),डिप्लोमा ,अभियांत्रिकी पदवी इ. करीत पुढील प्रमाणे रोजगार उपलब्ध आहे. बैकींग
रिटेल
बि.पी.ओ.
सिक्युरीटी
ई-कॉमर्स
मेन्युफक्चरींग
ॲकाऊंटींग
सेल्स आणि मार्केटींग
ई कॉम
फॉयनान्स
लॉजीस्टीक
के.पी. ओ.
फेसीलीटी मॅनेजमेंट एफ.एम.सी.जी. रियल इस्टेट
बॅक ऑफीस
ऑटोमोबाईल
हॉस्पीटीलीटी
टेलीकॉम
होम फायनान्स
अडमिनीस्ट्रेशन
हाऊसकिपींग
या रोजगार मेळाव्यामध्ये पाताळगंगा एम. आई . डी .सी मधील अनेक कंपन्या सहभाग घेणार आहेत. तर या रोजगार मेळाव्याच्या बरोबर सुशिक्षित बेरोजगार तरुण-तरुणींची नोंदणी करणार आहेत. व भविष्यात जस जशा नोकऱ्या उपलब्ध होतील तश्या त्यांना कळविण्यात येणार आहे.
*शिक्षणाची अट : इयत्ता ५वी आवश्यक
* कागदपत्र - बायोडाटा ५ प्रती / पॅनकार्ड / आधारकार्ड / मतदानकार्ड// ३ फोटो पासपोर्ट साईज / शैक्षणिक प्रमाणपत्र.
नोंदणी करिता व्हाट्सअप क्र. ९९२२११३३७६