प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे रेल्वे विभागाकडून फुकट्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. पुणे रेल्वे विभागात डिसेंबर महिन्यात तिकीट तपासणी दरम्यान 18 हजार 234 लोक विना तिकीट प्रवास करताना आढळून आले.
फुकट्या प्रवाशांकडून तब्बल 1कोटी 38 लाख रुपयांहून अधिकचा दंड वसूल करण्यात आला. तसेच 5434 जणांना अनियमित प्रवासासाठी 31लाख 41 हज़ार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच सामान बुक न करता तसेच घेऊन जाणाऱ्या 266 जणांकडून 31 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. या वर्षी एप्रिल ते डिसेंबर या 9 महिन्यांत 2 लाख 56 हज़ार 42 केसेस मध्ये 18 कोटी 34 लाख रूपये दंड स्वरूपात वसूल करण्यात आले.
ही कारवाई विभागीय रेल्वे व्यवस्थापक इन्दु दुबे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक बृजेश कुमार सिंह आणि वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे आणि विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. रामदास भिसे यांच्या समन्वयाने तिकीट निरीक्षकां द्वारे करण्यात आली.