भिडे वाड्यातील देशातील मुलींच्या पहिल्या शाळेतील इमारतीचे नूतनीकरणकरून राष्ट्रीय स्मारक करावे, या मागणीसाठी अनेक संघटनांच्या वतीने आज लाक्षणिक उपोषण



प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी आज (3 जानेवारी) भिडे वाड्यातील देशातील मुलींच्या पहिल्या शाळेतील इमारतीचे नूतनीकरण करून, या शाळेचे राष्ट्रीय स्मारक करावे, या मागणीसाठी अनेक संघटनांच्या वतीने हुतात्मा स्मारक, मजूर अड्डा येथे लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे.यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सावित्रीबाई, फातिमाबीवी, जोतिराव यांनी पुण्यात ज्या भिडे वाड्यात देशातली मुलींची पहिली शाळा काढली, ती भिडे वाड्यातली शाळा आज अत्यंत दुरवस्थेत आहे. त्या इमारतीचे नूतनीकरण करून तिथे राष्ट्रीय स्मारक उभे करावे, ही सर्वांची दीर्घकाळाची मागणी आहे. कष्टकऱ्यांचे नेते बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली “मुलींची पहिली शाळा स्मारक निर्माण समिती’मार्फत तिचा सातत्याने पाठपुरावाही केला जात आहे.

दरम्यान, 1 जानेवारी 2023 ला या शाळेचे शतकोत्तर अमृतमहोत्सवी वर्ष सुरू झाले आहे. या वर्षात तरी या स्मारकाचे काम पूर्ण व्हावे, ही प्रमुख मागणी आहे. यावेळी सावित्रीबाई-जोतिबांच्या विचारांचा जागर करण्यात येणार आहे. तसेच, जिथे हे उपोषण होत आहे, त्या मजूर अड्ड्यावरील अतिक्रमण हटवून तिथे कष्टकऱ्यांच्या विश्रांतीसाठी “मजूर भवन’ बांधण्यात यावे, अशीही मागणी युवक क्रांती दलाचे सचिन पांडुळे यांनी केली आहे. यात शहरातील जवळपास 25 प्रमुख संघटनांनी सहभाग घेतला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post